Monday 13 June 2022

DIO BULDANA NEWS 13.6.2022

 

ई व्हेईकल दुचाकी जोडणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे 16 ते 20 जूनपर्यंत आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा यांच्या विद्यमाने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतीसाठी बुलडाणा येथे ई व्हेईकल दुचाकी जोडणी व समस्या निवारण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 16 ते 20 जून 2022 कालावधीत 5 दिवस केले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करावा हा आहे.

    सदर प्रशिक्षण कार्यक्रमात बॅटरी चलीत वाहनाची ओळख, बॅटरी चलीत वाहनाची गरज व उद्योगातील संधी, बॅटरी चलीत दुचाकी वाहनांमध्ये उद्भवणारे दोष व त्यावरील उपाययोजना, वेगवेगळ्या चार्जींग पद्धती व चार्जिंग स्टेशनची उपयोगीता, मुलभूत मोटार चार्जर व दुरूस्ती, उद्योग सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य, उद्योजकता विकास आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. प्रशिक्षणात प्रवेश घेवू इच्छिणारा उमेदवार हा किमान 7 वी पास, वय 18 ते 50 वर्ष असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. तरी प्रशिक्षण नोंदणीसाठी 15 जुन 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, MCED, दुरदर्शन केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा यांच्या 8275093201 मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

**********

पाणी टंचाई निवारणार्थ 124 गावात 151 विंधन विहीरींना मंजूरात

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : पाणीटंचाई निवारणार्थ सिं.राजा तालुक्यातील 30, चिखली तालुक्यातील 9, बुलडाणामधील 27, दे.राजा मधील 15, मेहकर तालुक्यातील 26, लोणारमधील 5, मोताळा तालुक्यातील 3, मलकापूरमधील 1 व खामगांव तालुक्यातील 8 गावासाठी 151 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे एकूण 124 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

   विंधन विहीरी सिंदखेड राजा तालुक्यातील आडगांव राजा, केशवशिवणी, किनगांव राजा, कुंबेफळ, मलकापूर पांग्रा, मोहाडी, साखरखेर्डा, शेंदुर्जन, देऊळगांव कोळ, दुसरबीड, हिवरखेड,  खामगांव, पिंपळगाव लेंडी, नशिराबाद, लिंगा, सवडद, खैरखेड, सोयंदेव, चांगेफळ, चिंचोली,  देवखेड, वाघाळा, हिवरा गडलिंग, जऊळका, कोनाटी, महारखेड, पिंपरखेड, रताळी, शिवणी टाका, वरूडी,  चिखली तालुक्यातील पांढरदेव, धोत्रा भनगोजी, उत्रादा, शेलोडी, सावरगांव डुकरे, आंधई, अमडापूर, गोद्री, भालगांव, खामगांव तालुक्यातील खामगांव ग्रामीण, लाखनवाडा खु, बोथाकाजी, आडगांव, बोरी, गेरु माटरगांव, कारेगांव, आवार, मलकापूर तालुक्यातील वडोदा, मोताळा तालुक्यातील आडविहीर, बोराखेडी, तरोडा, लोणार तालुक्यातील जांभूळ, राजणसी, नांद्रा, गोत्रा, वेणी, दे. राजा तालुक्यातील दे. मही, गिरोली, भिवगांव बु, जुमडा, पिंपळगांव बु, गिरोली खु, कुंभारी, धोत्रा नंदई, पिंपळगांव चिलमखा, किन्ही पवार, वानेगांव, आळंद, वाकी बु, सावंगी टेकाडे, वाकी खु, मेहकर तालुक्यातील डोणगांव, लोणी काळे, पांगरखेड, शहापूर, विश्वी, रत्नापूर, मांडव, वरवंड, आंध्रुड, बरटाळा, उसरण, चिंचोली बोरे, पाथर्डी, उमरा देशमुख, पेनटाकळी, विठ्ठलवाडी, नागापूर, शेलगांव देशमुख, लोणी गवळी, भोसा, दे. साकर्षा, दादुल गव्हाण, वर्दडी वैराळ, पिंपळगांव उंडा, भिवापूर, गोहेगांव, बुलडाणा तालुक्यातील म्हसला खु, बिरशिंगपूर, भडगांव, धाड, पिं. सराई, रूईखेड मायंबा, साखळी खु, भादोला, पाडळी, मासरूळ, सुंदरखेड, अफजलपूर वाडी, दत्तपूर, कोलवड, येळगांव, माळविहीर, देऊळघाट, पळसखेड नागो, ईरला, कुलमखेड, कुंबेफळ, रायपूर, साखळी बु, मोंढाळा, सातगांव म्ह, सागवन व बोरखेड या गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

*****

    शेतकऱ्यांनी डीएपी चा आग्रह न धरता

संयुक्त खतामधुन पिकास योग्य मात्रा द्यावी

  • कृषी विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.13 :  जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ सुरु होत असुन शेतकऱ्यांचे रासायनिक खते व बियाणे खरेदीचे लगबग सुरु झाली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा डी.ए.पी खताच्या वापराकडे दिसुन येतो. त्यामुळे बाजारात डी.ए.पी ची मागणी वाढलेली दिसते. परंतु उपलब्ध संयुक्त खतातुन सुद्धा पिकाच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डी.ए.पी खताचा आग्रह न धरता संयुक्त खतातून पिकास योग्य मात्रा द्यावी जेणे करून डी.ए.पी खताऐवजी इतर संयुक्त खते वापरल्यास खर्चात बचत होते आणि शिफारशीप्रमाणे मात्रा सुद्धा देता येते.

  या बाबत प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर संयुक्त खताचा चार्ट दर्शनीय भागात लावण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी खरीप हंगामात पिकांसाठी डी.ए.पी ऐवजी सयुंक्त इतर खताचा वापर करावा. कृषी सेवा केंद्र व निविष्ठा बाबत काही तक्रार असल्यास ,कृषी सेवा केंद्रावर संबंधित कृषी सहाय्यक याची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच थेट तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती किवा कृषी विभाग क्रमांक ९७६७३९९३३२ वर संपर्क साधावा, असेआवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

********

 

No comments:

Post a Comment