Friday 26 November 2021

DIO BULDANA NEWS 26.11.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 305 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

  • 1 रूग्णाला मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 306 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 305 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 140 तर रॅपिड टेस्टमधील 165 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 305 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : समर्थ नगर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती रूग्णालयातून  1 रूग्णाला सुट्टी मिळाली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 736592 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86957 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86957 आहे.  आज रोजी 44 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 736592 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87645 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86957 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                        **********

                                    अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचे गहू व तांदुळ वाहतूकीचे आदेश पारीत

* 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकरिता माहे डिसेंबर 2021 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत धान्याची उचल करावी लागणार आहे. धान्य वाटपाचे परिणाम गहू 21 किलो प्रती कार्ड, तांदुळ 14 किलो प्रति कार्ड असून वाटपाचा दर हा गहू 2 रूपये प्रतिकिलो व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो आहे.

  गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.  बुलडाणा : गहू 1465 क्विंटल व तांदूळ 976, चिखली गहू 656 व तांदुळ 437, अमडापूर गहू 223 व तांदूळ 149, दे.राजा गहू 581 व तांदूळ 387, मेहकर गहू 870 व तांदूळ 580, डोणगांव गहू 274 व तांदूळ 183, लोणार गहू 1387 व तांदूळ 924, सिं.राजा गहू 574 व तांदूळ 383, साखरखेर्डा गहू 318 व तांदूळ 212, मलकापूर गहू 949 व तांदूळ 633, मोताळा गहू 1194 व तांदूळ 795, नांदुरा गहू 1277 व तांदूळ 851, खामगांव गहू 1015 व तांदूळ 975, शेगांव गहू 648 व तांदूळ 432, जळगांव जामोद गहू 1060 व तांदूळ 705, संग्रामपूर गहू 1289 व तांदूळ 858 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 13 हजार 780 व तांदूळ 9 हजार 180 क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        *******

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी 72 वर्ष पूर्ण झाले आहे.

  जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी  नायब तहसिलदार श्री. बंगाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.

No comments:

Post a Comment