Friday 12 November 2021

DIO BULDANA NEWS 12.11.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 305 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

·         2 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 306 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 305 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड ॲटींजेंट चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 189 तर रॅपिड टेस्टमधील 116  अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 305 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : लोणार तालुका : पार्डा दराडे 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. त्याचप्रमाणे आज उपचाराअंती 2 रूग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी मिळाली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 733578 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86943 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86942 आहे.  आज रोजी 28 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 733578 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87623 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86943 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 06 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                                    *****

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पं. दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा आधार!

* अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी असावा

swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 :राज्यात विभागीय, जिल्हास्तरावर अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वीत आहे. इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन 2016-17 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजना जिल्हा स्तरावरील शहरांमध्ये कार्यरत महाविद्यालयांत इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू आहे. त्याचप्रमाणे योजनेचा व्यापक स्वरूपात विस्तार करून तालुका स्तरावरसुद्धा योजना लागू करण्यात आली आहे. तालुकास्तरावर इ 12 वी नंतर तंत्र व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

    योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने इयत्ता 12 वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तसेच महानगरपालिका, विभागीय, जिल्हा व तालुका स्तरपासून 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये स्थापित असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना योजनेतंर्गत लाभ देण्यासाठी सुधारणा केली आहे. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुज्ञेय थेट रक्कम जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

 वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

   केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेतंर्गत लाभ देण्यात येणार आहे. मात्र दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे.

 ही आहे पात्रता

विद्यार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावे, विद्यार्थ्याकडे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.50 लाखाचे आत असणे आवश्यक आहे, प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहीवासी नसावेत, तसेच ही संस्था मान्यता प्राप्त असावी व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठीच विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थ्याला आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहांमध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नौकरी व व्यवसाय करत नसावा, एका शाखेची पदवीमध्येच सोडून दुसऱ्या शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतलेल्यास किंवा एका शाखेची पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण झालयानंतर इतर शाखेच्या पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा मात्र 1 विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल.  विद्यार्थ्याचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असून सदरचे खाते आधार कार्डशी संलग्न असावे.

    तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर तात्काळ संपर्क करून ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. बी हिवाळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                                    ****

सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज वाटप सुरू

·         26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिनस्त कार्यरत जिल्ह्यातील एकूण 17 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अर्ज वाटप संबंधित वसतीगृहांवर सुरू झालेले आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेशासाठी संबंधित वसतीगृहांवर अर्ज भरून सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                                                *****

                             कोरोना लसीकरणाचे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठ प्रशासन सज्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण सध्या नियंत्रणात असले असून कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हा आजतरी एकमेव पर्याय आहे. नागरीकांनी लसीकरण करीता स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे लसीकरण 100 टक्के 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांनी आपल्या गावातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करावे. तसेच जनजागृतीसाठी दवंडीद्वारे माहिती, हस्तपत्रकेद्वारे माहिती, सोशल मिडीयाद्वारे जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या गावांच्या नागरिकांचे 10 टक्के लसीकरण झाले आहे. त्या गावाचे सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गट यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर गावांनी अनुकरण करून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य होईल, याकरीता प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

                                                                                    *****

 

 

                 सोन्याच्या गिन्न्या कमी किमतीत विक्री करणाऱ्यांच्या फसवणूकीपासून सावध रहावे

·         पोलीस विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : किनगांव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात व्यक्तीने त्याचेकडे सोन्याच्या गिन्न्या स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून दापोली येथील नागरिकाची 6 लाख 90 हजार रूपयाची कोणतेही  सोने न देता शस्त्राचा धाक दाखवुन व मारहाण करून पैसे लुटून फसवणूक केली असल्याने पोलीस स्टेशन किनगांव राजा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशाप्रकारे यापूर्वी देखील जिल्ह्यातील व परीसरातील नागरिकांची खोदकामात सोने व दागीने सापडले आहे. सोन्याच्या गिन्न्या कमी किंमतीत विक्री करणे आहे, या सारखी बहाणेबाजी करून सामान्य नागरिकांना कमी किमतीत सोन्याचे दागीने, गिन्न्या विक्री करण्याचे आमीष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार घडले आहेत.

   तसेच दागिन्यांना पॉलीस करून देतो असे म्हणून महिलांकडील दागिने वितळूण फसवणूक करतात. अशा प्रकारे चोरट्यांची टोळी सक्रीय असून महिलांनी अशा भुलथापांना बळी पडू नये. आम्ही पोलीस आहोत, असे सांगून झडती घेऊन दागीने व पैसे घेऊन पळून जातात. अशा तोतया पोलीसांपासून सावध रहावे. आपल्या परीसरात अनोळखी इसम वारंवार येत असल्यास व पाळत ठेवत आहे. असा संशय वाटल्यास त्या व्यक्तीची विचारपूस करावी. मौल्यवान दागीने, रोख रक्कम घरात ठेऊन बाहेरगावी जाऊ नये. नागरिकांनी स्वस्तात सोन देण्याचे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. बाहेरगावी जाताना जवळचे पोलीस स्टेशनला कळवावे. अशा अनोळखी इसमांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दिल्यास नजीकचे पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्ष, बुलडाणा येथील दुरध्वनी क्रमांक 07262-242400 वर तातडीने संपर्क करून पोलीसांना माहिती देण्यात यावी व फसवणूकीपासून दक्ष रहावे, असे आवाहन पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे.

                                                                        ******

                        बीज प्रमाणीकरण कार्यालयातील निरूपयोगी साहित्याची करण्यात येणार विक्री

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, बुलडाणा यांचे कार्यालयातील निरूपयोगी लाकडी, लोखंडी आदी साहित्य निर्लेखित केले आहे. सदर निरूपयोगी साहित्य विक्री करावयाची आहे. त्यासाठी 22 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालय, दत्त मंदीराजवळ, सुवर्ण नगर,बुलडाणा येथे विक्री आयोजित करण्यात आली आहे. तरी निरूपयोगी साहित्य खरेदी करण्यास इच्छूक असणाऱ्या नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी बबन जाधव यांनी केले आहे.

                                                            *****

                        दिव्यांग विद्यार्थ्यांना डीबीटी अंतर्गत शिष्यवृत्ती; अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग शिष्यवृत्ती योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या तीन शिष्यवृत्ती योजनेतंर्गत जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून कार्यान्वीत केल्या जात आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत पीएफएमएस प्रणालीद्वारे त्यांचे बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे. यासाठी अर्जदार दिव्यांग विद्यार्थ्यांनी  राष्ट्रीय शिष्यवृतती पोर्टल www.scholarship.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज विहीत मुदतीत करावयाचा आहे. तरी या योजनेचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

                                                            *****

                              जिल्ह्यात 12 लक्ष 14 हजार 865 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के  लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 11 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 12,14,865 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 55.54 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्के जवळ आलेले 15 केंद्र आहे. तर 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 35 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 2 आहे.  जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे.

                                                                        **** 

No comments:

Post a Comment