Posts

Showing posts from April, 2021

DIO BULDANA NEWS 30.4.2021

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 29 एप्रिल रोजी 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. दिनांक 29 एप्रिल रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 39 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 35,रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 11, निकम हॉस्पीटल 10, जाधव पल्स हॉस्पीटल 13, सहयोग हॉस्पीटल 22, आशिर्वाद हॉस्पीटल 30, सिद्धीविनायक हॉस्पीटल 39, काटकर हॉस्पीटल 14, शिवसाई हॉस्पीटल 30, संचेती हॉस्पीटल 19, न्यु लाईफ कोविड हॉस्पीटल 1, सोळंकी हॉस्पीटल 7, सावजी हॉस्पीटल 14, चिखली : योगीराज हॉस्पीटल 45, हेडगेवार हॉस्पीटल 39, गुरूकृपा हॉस्पीटल 16, तायडे हॉस्पीटल 31, दळवी हॉस्पीटल 24, पानगोळे हॉस्पीटल 20, खंडागळे हॉस्पीटल 15, गंगाई हॉस्पीटल 15, जैस्वाल हॉस्पीटल 16, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 15, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 42, कोलते हॉस्पीटल 18,...

DIO BULDANA NEWS 29.4.2021

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधे पणाने; सकाळी 8 वाजता ध्वजारोहण बुलडाणा,(जिमाका) दि.29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्ष पुर्ण होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचवेळी सकाळी 8 वाजता केवळ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष इतक्याच पदाधिकारी / अधिकारी यांना उपस्थित रहावयाचे आहे. कार्यक्रमादरम्यान कवायत, संचलन आयोजनास मनाई आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालयात येथेच ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून जिल्ह्यात इतरत्र कोणत्याही कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभ ठेवू नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे यांनी कळविले आहे. *****************...

DIO BULDANA NEWS 23.4.2021

*कोरोना अलर्ट : प्राप्त 4858 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 1035 पॉझिटिव्ह* *733 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5889 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4858 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1035 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 565 व रॅपीड टेस्टमधील 470 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1179 तर रॅपिड टेस्टमधील 3675 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4858 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :208, बुलडाणा तालुका :रुईखेड 1, सागवन 2, देऊळघाट 2, उमाळा 1, सुंदरखेड 5, नांद्राकोळी 3, दहीद 2, पांगरी 1, जामठी 3, धाड 1, चौथा 5, वरवंड 2, डोमरूळ 4, तांदुळवाडी 2, करडी 4, पिं. सराई 11, जांभरून 4, कोलवड 2, गुम्मी 2, सव 1, रायपूर 4, जांब 1, डोंगर खंडाळा 1, ईरला 4, भादोला 1, साखळी 2, ढालसावंगी 3, मढ 1, दुधा 1, कुलमखेड 1, खुपगाव 1, सावळी 2, धामणगाव 1, वरुड 1, टाकळी 1, म्हसला 1, पाडळी 6, जन...

DIO BULDANA NEWS 20.4.2021

मासेमारी करताना मृत्यूमुखी पडलेल्या अरूण किकराळे यांच्या कुटूंबीयांना मदतीचा धनादेश प्रदान बुलडाणा,(जिमाका) दि.20: येळगांव जलाशयामध्ये मासेमारी करतांना कै. अरुण आनंदा किकराळे यांचा मुत्यू झाला आहे. अरुण आनंदा किकराळे हे मच्छिमार सहकारी संस्था मर्यादीत येळगांव संस्थेचे सभासद होते. मच्छिमारांना मच्छिमार कायदयाने वारसदारांना उदनिर्वाहा करीता निधी दिला जातो. तसेच मृतकाची पत्नी श्रीमती अलका अरुण किकराळे यांना शासनाने मासेमारी संकट निवारण निधी योजने अंतर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालयामार्फत 1 लाख रुपये निधी सहाय्यक आयुक्त स. इ. नायकवडी यांचे हस्ते मृत मच्छिमारांचे वारसदार यांना दि. 16 एप्रिल 2021 रोजी धनादेश प्रदान करण्यात आला आहे. यावेळी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादीत येळगांव संस्थेचे अध्यक्ष तुकारात आनंदा किकराळे, सचिव सुभाष गंगाराम राऊळकर, मनोहर राजाराम घट्टे, जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष दादाराव जाधव, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी इं. तु. देवकत्ते उपस्थित होते, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक)स. इ. नायकवडी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे...

DIO BULDANA NEWS 19.4.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 2002 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 874 पॉझिटिव्ह 691 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.19 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2876 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2002 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 874 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 724 व रॅपीड टेस्टमधील 150 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1127 तर रॅपिड टेस्टमधील 875 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2002 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 158, बुलडाणा तालुका : सुदंरखेड 3, अजिसपूर 1, ढालसावंगी 1,करडी 1, देऊळघाट 2, मासरूळ 3, बिरसिंगपूर 1, डोंगरखंडाळा 1, टाकळी 1, नांद्राकोळी 1, मढ 1, कोलवड 1, दुधा 1, सागवन 3, चांडोळ 1, कुंबेफळ 2, पोखरी 1, पिं. सराई 2, सावळी 2, मोताळा शहर : 2 , मोताळा तालुका :पिंपळगावनाथ 1, बोराखेडी 1, गोतमारा 2, काबरखेड 2, राजुर 1, तरोडा 2, रोहीणखेड 1, आडविहीर 1, वडगांव 2, शेलापूर 2, आव्हा 1, खामगांव शहर...

DUO BULDANA NEWS 14.4.2021

Image
कोरोना अलर्ट : प्राप्त 2742 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 676 पॉझिटिव्ह 346 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3418 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2742 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 676 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 504 व रॅपीड टेस्टमधील 172 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 938 तर रॅपिड टेस्टमधील 1804 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2742 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :97, बुलडाणा तालुका :भादोला 1, कोलवड 2, हतेडी 1, पि. सराई 2, देऊळघाट 1, येळगांव 3, सव 2, सुंदरखेड 2, नांद्राकोळी 2, खुपगांव 1, तांदुळवाडी 1, गुम्मी 1, धाड 2, म्हसला 1, दुधा 1, साखळी खु 1, सागवन 1, पिंपळगांव 1, पांगरी 1, मासरूळ 1, साखळी बु 1, माळवंडी 1, कुंबेफळ 1, दहीद 1, सावळी 1, अजिसपूर 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : पिं. गवळी 1, धा. बढे 6, किन्हेळा 2, खेर्डी 1, लपाली 1, सिंदखेड...

DIO BULDANA NEWS 11.4.2021

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन बुलडाणा, दि. 11 : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने दि. 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला नायब तहसिलदार श्री. साठे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी पुष्प अर्पण केले. ************** भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि.11: कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र जमून तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन जयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजूपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी जयंती साजरी करणे अ...

DIO BULDANA NEWS 9.3.2021

Image
कोरोना अलर्ट : प्राप्त 4792 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 619 पॉझिटिव्ह 784 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5411 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4792 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 619 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 312 व रॅपीड टेस्टमधील 307 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 556 तर रॅपिड टेस्टमधील 4236 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4792 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 98, बुलडाणा तालुका :गोंधनखेड 1, मासरूळ 1, कुलमखेड 2,डोमरूळ 2, टाकळी 1, धाड 3, जांब 1, रूईखेड 2, पिं. सराई 2, सागवन 1, सावळी 5, म्हसला 1, कुंबेफळ 1, चांडोळ 1, करडी 1, रायपूर 5, मोताळा शहर :6 , मोताळा तालुका : पिं. देवी 2, शेलापूर 1, निपाणा 1, माळेगांव 1, आव्हा 3, उऱ्हा 2, धानखेड 1, वरूड 1, जयपूर 5, पुन्हई 1, उबाळखेड 2, मुर्ती 1, रोहीणखेड 3, धा. बढे 6, किन्होळा 1, खामगांव शहर : 46...

DIO BULDANA NEWS 8.4.2021

Image
केंद्रीय पथकाने घेतला कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा दोन सदस्यीय पथक बुलडाणा,(जिमाका) दि.8 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती आहे. वाढत्या रूग्णसंख्या व अनुषंगिक बाबींविषयी आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आज जिल्ह्यात दाखल झाले. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा, भुवनेश्वर आयुर्विज्ञान संस्थानमधील भूलतज्ज्ञ आंतर वैद्यकीय विभागातील सहा. प्राध्यापक डॉ दृष्टी सुंदरदास, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अति. आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदी उपस्थित होते. त्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांच्या कक्षात पुन्हा तालुकानिहाय कोरोना संसर्ग व उपाययोजनांचा आढावा घेतला. ...

DIO BULDANA NEWS 7.4.2021

             दस्त नोंदणीकरीता कोविडचा आरटी पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य दुय्यम निबंधक कार्यालयाचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि 7 :    सहजिल्हा निबंधक वर्ग 1 बुलडाणा व अधिनस्थ एकूण प्रत्येक तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणारे पक्षकारांची संख्या विचारात घेता गर्दी जास्त प्रमाणात होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव असल्याने व जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने दुय्यतम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरीता व इतर कार्यालयीन कामाकरीता येणाऱ्या पक्षकार यांचेकडे कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य आहे. सदर रिपोर्ट पक्षकार उपलब्ध करून देणार नसतील, अशा पक्षकारांना कार्यालयात प्रवेश मनाई राहील. सदरची कार्यवाही 12 एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे. तरी दस्त नोंदणीकरीता येणाऱ्या पक्षकारांनी कोविड 19 चा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल आणावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 2 बुलडाणाचे विजय तेलंग यांनी केले आहे. ****** ...

DIO BULDANA NEWS 6.4.2021

Image
  कंपन्यांशी चर्चा करून रेमडेसिवीरचे दर नियंत्रणात ठेवणार  - पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे  कोविड नियंत्रणावर लसीकरण हा प्रभावी उपाय ऑक्सीजन पुरवठा, रेमडेसिवीरची उपलब्धतेचा घेतला आढावा कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक बुलडाणा, (जिमाका) दि 6 :  कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात पर्याप्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत कंपन्यांशी चर्चा करून उत्पादनही वाढवायला लावले आहे. त्यामुळे या औषधाचा मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करून या औषधाचे दर नियंत्रणात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातही वाढीव दराने या औषधाची विक्री होत असल्यास धाडी टाकून तपासण्या कराव्यात, अशा सूचना  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी आज दिल्या.     कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि....

DIO BULDANA NEWS 5.4.2021

  पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे  आयोजन • उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे • 7 एप्रिलपर्यंत चालणार मेळावे बुलडाणा,(जिमाका)दि.5 :  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 5 ते 7 एप्रिल 2021 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.rojgar. mahaswayam.  gov.in  संकेतस्थळावर भरावे.     या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 100 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा ...