Posts

Showing posts from March, 2021

DIO BULDANA NEWS 31.3.2021

Image
  पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण बुलडाणा,(जिमाका) दि.31 :  जिल्ह्यातील शहीद जवान प्रदीप साहेबराव मांदळे (युनिट 10 महार रेजिमेंट) रा. पळसखेड चक्का, पो सावखेड तेजन ता. सिं. राजा  हे देशातंर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन रक्षक मोहिमे अंतर्गत नियंत्रण रेषेजवळ द्रास सेक्टर येथील ऑपरेशन एरियामध्ये हिमस्खलनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे 15 डिसेंबर 2020 रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने 1 कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानच्या कुटूंबियांना प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया,  सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती कांचन प्रदीप मांदळे, वीरमाता श्रीमती सुनंदा साहेबराव मांदळे यांना 40 ल...

DIO BULDANA NEWS 26.3.2021

  कोरोना अलर्ट : प्राप्त 3613 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 903 पॉझिटिव्ह • 644 रूग्णांना मिळाली सुट्टी     बुलडाणा,(जिमाका) दि.26 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4516 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3613 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 903 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 589 व रॅपीड टेस्टमधील 314 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 520 तर रॅपिड टेस्टमधील 3093 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3613 अहवाल निगेटीव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 75, बुलडाणा तालुका : बोरखेड 1,   डोंगरखंडाळा 1, माळवंडी 1, सुंदरखेड 2, चांडोळ 4, धाड 2, डोमरूळ 1, नांद्राकोळी 1, अंबोडा 4, हतेडी बु 1, जांब 12, दहीद 1, शिरपूर 3, पळसखेड भट 1, वरवंड 9, बिरसिंगपूर 1, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : सारोळा 3, काबरखेड 1,पोफळी 1,   किन्होळा 1,   पुन्हई 1, चिंचपूर 6, कोथळी   5, मुर्ती 1, तालखेड 5, ...

DIO BULDANA NEWS 24.3.2021

  जिल्ह्यात 26 ठिकाणी क्षयरोगाच्या निदाणाकरीता थुंकी नमुन्यांची तपासणी बुलडाणा, (जिमाका) दि.24 :  जिल्ह्यामध्ये डिएससी मान्यताप्राप्त सुक्ष्मतादर्शक एकूण 26 केंद्रे आहेत. तेथे थुंकी नमुन्यांची तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करण्यात येते. प्रत्येक क्षयरोग पथकाला एक वैद्यकिय अधिकारी व वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक कार्यरत आहे. जिल्ह्यात  ङि एम. सी. साठी 1 वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, 6 शहरी भागासाठी 6 टि. बी. एच. व्हि.कार्यरत आहे. तसेच सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमा अंतर्गत 5 प्रयोगशाळा वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे.        जिल्ह्यात एक जिल्हा क्षयरोग केंद्र आहे. तेथे जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकिय अधिकारी आदी कार्यरत आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला अंदाजे शासकीय रुग्णालयातून 130 खाजगी डॉक्टरांकडून 120 असे एकूण अंदाजे 250 नविन टि. बी. रुग्ण शोधुन उपचारावर ठेवले जातात. दरवर्षी अंदाजे एकुण 2700 ते 2900 टि.बी. रुग्ण शाधुन उपचारावर ठेवले जातात. तसेच जिल्ह्यामध्ये मार्च 2016 पासून क्षयरोगाचे निदान करण्यासाठी अत्याधुनिक...

DIO BULDANA NEWS 23.3.2021

Image
  27 व 28 मार्च सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार बुलडाणा, (जिमाका) दि.23  : सन 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट दि. 31 मार्च 2021 पर्यत साध्य करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कातील अधिभारामध्ये दिलेली सुट 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात येत असल्याने नोंदणी कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करीता पक्षकारांची जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यालयामध्ये कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयामध्ये पक्षकारांची गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी शनिवार दि. 27 व रविवार दि. 28 मार्च 2021 रोजी दस्त नोंदणी करीता सुरु ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग – 1 उमेश के. शिंदे तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 00000000 पात्र असलेल्या सामायिक खातेदारांनी एका बँक खात्याचे संमतीपत्र द्यावे ऑक्टोंबर – नोव्हेंबर 2019 मध्ये क्यार, महा चक्रीवादळामुळे झालेली नुकसान भरपाई सामायिक खात्यांमुळे काही श...

DIO BULDANA NEWS 19.3.2021,1

Image
  पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण बुलडाणा,(जिमाका) दि.19 : जिल्ह्यातील शहीद जवान सतिष सुरेश पेहरे रा. अमोना पो. शेलगांव आटोळ ता. चिखली हे पुर्व लद्दाख गलवान घाटी, जम्मू काश्मिर येथे 14 जुलै 2020 रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने 1 कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान सतिष पेहरे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती जया सतिष पेहरे, वीरमाता श्रीमती अलका सुरेश पेहरे यांना 20 लक्ष रूपये, वरपिता सुरेश छोटीराम पेहरे यांना 20 लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला.    ***** दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी भोवली ; दोन आरोपी ताब्यात खामगांव वनपरिक्षेत्र...

DIO BULDANA NEWS 19.3.2021

Image
  सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर कमीतकमी दरात विकावे  - पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे   मेडीकल स्टोअर्सवरील फार्मासिस्ट, कर्मचारी यांचे लसीकरण करावे बुलडाणा, (जिमाका) दि 19 :  कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शन आता जिल्ह्यामध्ये 1110 रु ते 1400 रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिली आहे.     रेमेडेसिवीर औषधांच्या दर, उपलब्धतेबाबत जिल्हा केमीस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन समवेत बैठकीचे आज 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले.  यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके,  केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार, सचिव गजानन शिंदे, अमरावती विभागाचे राम ऐलानी आदी उपस्थित होते.     गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक ...

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

Image
" सातपुडा, अजिंठा रांगांनी सजले ।  निसर्गसौंदर्य अलौकिक हो लाभले ।।  म्हणतात याला विदर्भाचे प्रवेशद्वार ।  लोणार सरोवर निसर्गाचा अद्वितीय आविष्कार ।।  जन्मभूमी ही स्वराज्यजननी जिजाऊंची । भूमी ही पावन इतिहासाची साक्षीदार ।। 'विदर्भाची पंढरी' शेगाव नगरीला मान । पूर्णा, पैनगंगेने लाभले सुपीकतेचे वरदान ।। बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती ।  बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती ।।"  बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातूनच यावे लागते म्हणून बुलडाणा जिल्ह्याला 'विदर्भाचे प्रवेशद्वार' देखील म्हंटल्या जाते. जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बु...