Posts

Showing posts from November, 2020

DIO BULDANA NEWS 26.11.2020

Image
    जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर 7 डिसेंबर रोजी तालुकास्तरावर, तर 10 डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर आयोजन   बुलडाणा,(जिमाका) दि.26 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.   महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 7 डिसेंबर 2020 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.   तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच न...

DIO BULDANA NEWS 25.11.2020

Image
  कोरोना अलर्ट : प्राप्त 1783 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 18 पॉझिटिव्ह •       53 रूग्णांना मिळाली सुट्टी   बुलडाणा,(जिमाका) दि.25:  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1801 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1783 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1651 तर रॅपिड टेस्टमधील 132 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1783 अहवाल निगेटीव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, चिखली तालुका : मेरा खु 1, दहीगांव 1,  सावखेड बु 1, धोत्रा भणगोजी 1,  चिखली शहर : 2, खामगांव तालुका : घाणेगांव 1, खामगांव शहर : 2, सिं. राजा शहर : 1, दे. राजा शहर : 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे.       तसेच आज 53 रूग्णांनी कोरोनावर मात केल...

DIO BULDANA NEWS 24.11.2020

  कोरोना अलर्ट : प्राप्त 775 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 45 पॉझिटिव्ह •        52 रूग्णांना मिळाली सुट्टी   बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 820 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 775 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 42 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 646 तर रॅपिड टेस्टमधील 129 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 775 अहवाल निगेटीव्ह आहेत.      पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :   खामगांव शहर : 6, चिखली तालुका : भोकरवडी 1, धोडप 1, मेरा बु 2, चिखली शहर : 1, नांदुरा तालुका : माळेगांव गोंड 3, नांदुरा शहर : 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 2, जळगांव जामोद शहर : 3,   बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 1, कोलवड 2,   दे. राजा शहर : 1,   दे. राजा तालुका : अंभोरा 1, नागणगांव 1, सिं. राजा शहर : 2, सिं...

DIO BULDANA NEWS 23.11.2020

Image
  खडकपूर्णा प्रकल्पातून पहिल्या पाळीसाठी आज पाणी सोडणार •       लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज सादर करावे   बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  यावर्षी खडकपूर्णा प्रकल्प ता. दे. राजा मध्ये 100 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामाकरीता पाणी पाळी देण्याचे नियोजन आहे. खडकपूर्णा धरणाचे बुडीत क्षेत्रालगतचे लाभक्षेत्र, खडकपूर्णा नदीपात्रातील डाव्या व उजव्या तिरावरील लाभक्षेत्र शेतकऱ्यांना स्वखर्चाने पाण्याचा उपसा करून व नदी प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना, डाव्या व उजव्या मुख्य कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मालकी हक्काची शेती थेट विमोचकाखाली व कालव्यावरून उपसाद्वारे पिकविता येणार आहे. विधान परिषद निवडणूकीची आचार संहीता असल्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक होवू शकली नाही. तरी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या सूचनेनुसार  पाण्याची एक पाळी 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देण्यासाठी कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार खडकपूर्ण...

DIO BULDANA NEWS 22.11.2020

 मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी छायाचित्र उपलब्ध करून द्यावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि. 22 :भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर मतदार सादीचा विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीनुसार ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, मात्र छायाचित्र उपलब्ध नाही, अशा  मतदारांनी आपले छायाचित्र आपल्या मतदार यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे उपलब्ध करून द्यावे.             विहीत मुदतीत छायाचित्र उपलब्ध करून न दिल्यास मतदान नोंदणी अधिनियम 1960 मधील प्रचलीत तरतुदींनुसार संबंधीत मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी मतदारांचे नाव मतदार यादीमधून कमी करण्याची कार्यवाही करणार आहेत. तरी मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या छायाचित्रे नसलेल्या मतदारांनी त्यांची छायाचित्रे  त्यांच्या मतदार यादी भागांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे तात्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस र...

DIO BULDANA NEWS 20.11.2020

  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनाळा यात्रा रद्द मंदीराच्या आतील कार्यक्रमांना 10 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी    बुलडाणा,(जिमाका) दि.20:  सोनाळा ता. संग्रामपूर येथे दरवर्षीप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला संत सोनाजी महाराज यांची यात्रा आयोजित करण्यात येते.  या यात्रा महोत्सवात पालखी महोत्सव, संत सोनाजी महाराज यांचा रथ उत्सव, दहीहंडी कार्यक्रम, महाप्रसाद, विविध वस्तुंची दुकाने, आनंद मेळा आदी कार्यक्रमांचा समावेश असतो. कार्तिक पौर्णिमेला विविध गावांमधून येणाऱ्या पालख्या रात्री 8 वाजेसुमारास सोनाजी महाराज यांचे मंदीरात प्रवेश करतात. रात्री 11 वाजता सोनाजी महाराज यांची रथ मिरवणूक गावामधून काढण्यात येते. मात्र सद्यस्थितीत सोनाळा, टुनकी व बावनबीर या गावांमध्ये कोविड 19 संसर्गग्रस्त रूग्ण आहेत. वेगवेगळ्या गावांमधून 1 लाख लोकांची गर्दी यात्रेनिमित्ताने जमल्यास कोविड आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.   कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 4 अन्वये जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कोरोना विषाणूचा प...

DIO BULDANA NEWS 19.11.2020

Image
  शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान मतदान प्रक्रिया जाणून घेण्याचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. 19 :  अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूकीचा कार्यकम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत पात्र शिक्षक मतदारांनी मतदान करताना काळजी घ्यावी. मतदानाची प्रक्रिया  जाणून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भिकाजी घुगे यांनी केले आहे. शिक्षक मतदारांनी असे करावे मतदान केवळ आणि कवेळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेनच मत नोंदवावे. इतर कोणताही  पेन, पेन्सिल, बॉलपेनचा  वापरू नये.   तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’   हा अंक लिहून मत नोंदवावे.  निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 आदीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावा समोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाच...

DIO BULDANA NEWS 18.11.2020

इयत्ता 10 व 12 वी परीक्षांचे आयोजन इयत्ता 10 वीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर इयत्ता 12 वी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर कालावधीत बुलडाणा,(जिमाका) दि. 18 :    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12) परिक्षा दि. 20 नोव्हेंबर    ते 10 डिसेंबर 2020 पर्यत आणि शालांत प्रमाणपत्र    (इयत्ता 10) ची परिक्षा दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परिक्षे दरम्यान भरारी पथके पेपरच्या दिवशी    अधिनस्त कार्यक्षेत्रात परिक्षा केंद्रावर आकस्मिक भेटी देणार आहे.  परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथके प्राधान्य देणार असून परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कारवाई करावी, असे    निर्देश अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती    तथा जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.                 परिक्षेदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास संबंधिताविरुध्द महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीस ॲक्ट युनिव्हरसिटी बोर्ड ॲण्ड ऑदर एक्झामिनेशन ॲक्ट 1982 चे कलम...