Thursday 7 May 2020

DIO BULDANA NEWS 7.5.2020



जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत आणखी दुकाने उघडण्यास परवानगी
·        सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत मुभा
        ·       जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश, कन्टेन्टमेंट झोन बाहेर परवानगी
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र  शासनाने  देशभर 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच राज्यात व जिल्ह्यात साथरोग अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाने वस्तु व सेवांचा सुलभ पुरवठा व्हावा म्हणून सर्व दुकाने सकाळी 7 ते सायं 7 या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास सुचीत केले आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यामध्ये संचारबंदी कालावधीत सर्व दुकाने व सेवा सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये सीलबंद मद्यविक्रीची दुकाने वगळण्यात आली आहे. ती सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
    जिल्ह्यात ह्या सेवा सुरू राहणार : जिवनावश्यक वस्तू विक्री ठिकाणे धान्य व किराणा, बेकरी, फळे व भाजीपाला, कृषि संबंधीत सर्व दुकाने, दुधाची दुकाने, पेट्रोल पंप, अंडी, मांस, मच्छी, पशुखाद्य व चारा विक्री दुकाने,  रूग्णालये, नर्सिंग होम, क्लिनीक, टेलिमेडीसीन्स सुविधा, केमिस्ट, औषधी दुकाने, वैद्यकीय साहित्याचे दुकाने, सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय प्रयोगशाळा व संग्रह केंद्रे, पशुवैद्यकीय रूग्णालये, दवाखाने, क्लिनीक, पॅथोलॉजी, औषधी विक्री व पुरवठा, रूग्णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय आरोग्याच्या पायाभूत सोयी सुविधांचे बांधकाम, डायग्नोस्टीक रूग्णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, कच्चा माल व मध्यवर्ती घटकांचे युनीट, शिवभोजन केंद्र, स्वस्त धान्य दुकाने व त्याबाबतची वाहतूक, शेती व फळबागा संबधीत सर्व कामे, कृषि उत्पादने खरेदी करणाऱ्या यंत्रणा तसेच शेतमालाची उद्योगाद्वारे, शेतकऱ्यांद्वारे शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारी थेट विपणन हमी भावाने खरेदी करणाऱ्या यंत्रणांची कामे सुरू राहतील. कृषि उत्पन्न बाजार समित्या, शेतीविषयक यंत्र व त्यांचे सुटे भाग विक्री दुकाने, दुरूस्ती करणारे दुकाने, शेतीसाठी भाडेतत्वावर अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स, रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके यांचे उत्पादन वितरण व विक्री करणारी कृषि सेवा केंद्र, गॅस एजन्सी, इमारतींची बांधकामे सुरू राहतील. दुध संकलन व त्याचे वितरण, पशुपालन व कुक्कुटपालन, गोशाळा सुरू राहतील. बँका, सर्व एटीएम, एलआयसी, पोस्ट ऑफीस संबंधीत सर्व सेवा सुरू राहतील.
  त्याचप्रमाणे लहान मुले, अपंग, विधवा, मतिमंद, ज्येष्ठ नागरिक यांचे संबंधी चालविण्यात येणारी निवारागृहे, लहान मुलांसाठी असलेली निरीक्षण गृहे, सुरक्षा गृहे,  सामाजिक सुरक्षा निवृत्ती वेतन वाटप, अंगणवाडी संबंधीत सर्व कामे, लाभार्थ्यांना पोषण आहाराचे घरपोच वाटप सुरू राहील. विवाह समारंभ जास्तीत जास्त 20 लोकांच्या परवानगीने करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. मात्र नगर पालिका क्षेत्रात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीला या विवाहाची वेळ व दिनांक कळविणे आयोजकांवर बंधनकारक असणार आहे. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींना परवानगी राहील. मनरेगाची कामे करता येतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतूक वितरण व साठवणूकीस परवानगी राहील. पाणी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर सुरू राहतील. दारू सोडून अन्य कोणत्याही वस्तू व सेवांसाठी ऑनलाईन सुविधांचा वापर व घरपोच डिलीवरी देता येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या किमान अंतरासह महामार्गावरील ट्रक दुरूस्तीचे दुकाने सुरू राहतील.   
  लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या वैद्यकीय व आपत्कालीन कर्मचारी, पर्यटक व व्यक्तींसाठी हॉटेल, लॉज सुरू राहतील. इलेक्ट्रीशीयन, संगणक अथवा मोबाईल दुरूस्ती, वाहन दुरूस्ती, नळ कारागीर, सुतार यांच्या सेवा सुरू राहतील. नगर पालिका क्षेत्राचे हद्दीबाहेर व ग्रामीण भागातील उद्योग, बांधकामास परवानगी देण्यात येत आहे. मान्सूनपुर्व संबंधीत सर्व कामे सुरू राहतील. आपत्कालीन सेवांसाठी वैद्यकीय, पशुवैद्यकीय सेवा, आवश्यक वस्तू खरेदीसाठी खाजगी वाहने चालकाव्यतिरिक्त दोन प्रवाशांना परवानगी राहील.
   जिल्ह्यात ह्या सेवा प्रतिबंधीत असणार आहे : सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वे मधून सर्व प्रवासी हालचाल बंद राहील, वैद्यकीय कारणा शिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी, अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पुर्णपणे बंदी असेल, सर्व शैक्षणिक प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग बंद राहील, सर्व सिनेमा हॉल, बार व तत्सम ठिकाणे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा व क्रीडा कॉम्प्लेक्स बंद राहतील, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे भविकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदी बंद राहतील. सायकल रिक्क्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी, कॅब ॲग्रीग्रेटर, जिल्ह्यातंर्गत व जिल्ह्याबाहेरील बसेस, केशकर्तनालयाची दुकाने, स्पास आणि सलुन्स, तंबाखू व तंबाखूजन्य विक्री दुकाने, पानटपरी, चहाचे स्टॉल्स, उपहारगृहे व जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिलेल्या आदेशामधील ढाबे वगळून इतर सर्व ढाबे बंद राहतील.
   सर्व बाहेर राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी, कामगार व इतर नागरिक आल्यानंतर तालुका समिती यांचेकडे नोंद करून आरोग्याची तपासणी करून घेतील. तसेच त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक राहील. उपरोक्त परवानगी दिलेली सर्व दुकाने प्रतिबंधीत क्षेत्रात सुरू राहणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग अधिनियम 1897 फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    ++++
अडकून पडलेल्या नागरिकांना घरटे जवळ करण्यासाठी एसटी सज्ज
·        बस मागणीसाठी आगारांशी संपर्क साधावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण व अन्य कारणांमुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरिकांना त्यांचे घरटे जवळ करण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे.
   प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने शासनाने विहीत केलेले प्रवासास अनुमती देण्यात आल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नागरिकांना प्रवासाचे सुरूवातीचे ठिकाण व शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानगी देण्यात येईल. मार्गातील मधल्या थांब्यावर उतरता येणार नाही. बसच्या मागणी करीता बसचा मार्ग, वेळ, प्रवाशांची संख्या आदीसह बस सोडावयाची आहे त्या ठिकाणच्या संबंधित आगार व्यवस्थापक यांचेकडे मागणी करावी. सदर बसेस या लॉक डाऊन कालावधीपुरतेच मर्यादीत राहतील. बसमध्ये सुरक्षीत अंतर ठेवूनच म्हणजेच एका बाकावर एक प्रवाशी याप्रमाणे एक बसमध्ये 22 प्रवाशांस प्रवास करता येणार आहे. तसेच प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक राहील.
  बसमध्ये प्रवेश करतांना त्यांचेकडील शासनाने प्रवासास परवानगी दिल्याचे प्रमाणपत्र, नागरिकाचे आधारकार्ड अथवा शासनाने जारी केलेले ओळखपत्र आवश्यक राहणार आहे. बस उपलब्ध करून देताना मागणी केलेल्या गावाचे जाण्या येण्याचे अंतर यास रूपये 44 प्रति किलो मीटर प्रमाणे गुणून येणारी रक्कम यामध्ये रूपये 50 प्रति बस अपघात सहाय्यता निधीची बेरीज करून येणारी रक्कम नगदी स्वरूपात मागणीवेळी जमा करावी लागणार आहे. बसच्या मागणीकरीता संबंधित आगार व्यवस्थापक यांचे कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक हे 24 तास सुरू राहणार आहे.
   बस आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख यांचे मोबाईल क्रमांक व दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. सदर क्रमांक पुढीलप्रमाणे : आगार बुलडाणा : 07262 242392, आगार व्यवस्थापक  आर. यु मोरे 8208952614 व स्थानक प्रमुख डि. बी साळवे 8087378154, चिखली आगार : 07264 242099, आगार व्यवस्थापक व्ही. एस वाकोडे 9420242097 व स्थानक प्रमुख एस. आर जोगदंडे 9881564020,  खामगांव आगार : 07263 252225, आगार व्यवस्थापक एस.एच पवार 9765940627 व  स्थानक प्रमुख  आर. यु पवार 9763703744, मेहकर आगार : 07268 224544, आगार व्यवस्थापक आर. ए कोळपे 9423745486 व स्थानक प्रमुख एच.ई नागरे 9730842233, मलकापूर आगार : 07267 222165,  आगार व्यवस्थापक डी. के दराडे 9923845605 व स्थानक प्रमुख योगेश वांदे 9890626544, जळगांव जामोद आगार : 07266 221502, आगार व्यवस्थापक स्व. कै. मास्कर 9881962173 व स्थानक प्रमुख एस. डी घुगे 9309734560, शेगांव आगार : 07265 254173, आगार व्यवस्थापक एस. ए भिवटे 8329773384 व स्थानक प्रमुख ए. यु मुसळे 9922496649 आहे. तसेच नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालय, बुलडाणा येथील दुरध्वनी क्रमांक 07262 242594 आहे.
  तरी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून इच्छीत स्थळी जाण्यासाठी बसेसची मागणी करावी, असे आवाहन विभाग नियंत्रक श्री. रायलवार यांनी केले आहे.
                                                            *************
कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 05 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : जिल्ह्यात आज प्राप्त 05 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 589 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 24 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत 20 कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 20 असून सध्या रूग्णालयात 3 रूग्ण उपचार घेत आहेत.
   तसेच आज 7 मे रोजी 05 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 05 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 22 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 3 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 589 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment