Posts

Showing posts from April, 2020

DIO BULDANA NEWS 30.4.2020

Image
कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…! ·          लॉकडाऊन कालावधीत 85.64 क्विंटल उत्पादन ·          शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करीत केली मासेमारी ·          मत्स्यव्यवसाय विकास विभागाने दिल्या 72 पासेस बुलडाणा, (जिमाका) दि. 30 :  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारिरीक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून कालावधी जरी लॉकडाऊनचा असला तरी मासळी उत्पादनाचा असल्याचा प्रत्यय त्यामुळे येत आहे.    बुलडाणा जिल्ह्यात  27 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 30 एप्रिल 2020 पर्यंत...

DIO BULDANA NEWS 29.4.2020

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धान्य वाटपाचे दर व परिमाण जाहीर बुलडाणा, (जिमाका) दि. 29 :  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत माहे मे 2020 चे नियतनातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धान्याचे वाटप दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी गहू 20 किलो प्रतिकार्ड, तांदुळ प्रतिकार्ड 15 किलो व साखर 1 किलो प्रतिकार्ड परिमाण राहणार आहे. तसेच प्रतिकिलो गहू दर 2, तांदुळ 3 व साखर 20 रूपये किलो असणार आहे.    त्याचप्रमाणे प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 3 किलो व तांदुळ प्रतिव्यक्ती 2 किलो परिमाण असेल. तर गहू प्रतिकिलो 2 रूपये व तांदुळ 3 रूपये किलो असणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत समाविष्ट न होणारे एपिएल (केशरी) शिधापत्रिका शेतकरी असलेल्या लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 4 किलो व तांदुळ प्रतिव्यक्ती 1 किलो परिमाण आहे. दर गहू प्रतिकिलो 2 रूपये व तांदुळ 3 रूपये किल...

दोन रूग्ण कोरोनावर मात करीत परतले स्वगृही…!

Image
दोन रूग्ण कोरोनावर मात करीत परतले स्वगृही…! ·          मलकापूर व बुलडाणा येथील रूग्ण बुलडाणा, (जिमाका) दि. 28 :  कोरोना या शब्दाने संपूर्ण जगाला छळले आहे. त्यामध्ये आपला देश, राज्य व जिल्हाही अपवाद नाही. कोरोना विषाणूच्या थैमानाने जग मेटाकुटीस आले आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातून कोरोनाच्या या हल्लकल्लोळात काही सुखद वृत्तही येत आहे. आज 28 एप्रिल रोजी आणखी दोन रूग्णांनी कोरोनावर मात दिली आहे. कोरोनातून बरे झाल्याने मलकापूर व बुलडाणा येथील रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.             जिल्ह्यात एकूण 24 कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. त्यापैकी एक मृत आहे. यामध्ये बुलडाणा 9, चिखली 3, दे.राजा 2, सिं. राजा 1, मलकापूर 4, शेगांव 3 व चितोडा ता. खामगांव येथे 2 रूग्ण होते. अशाप्रकारे जिल्ह्यात 24 रूग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत 15 रूग्णांना बरे झाल्याने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये आज दोन रूग्णांची भर पडली असून ही संख्या 17 झाली आहे. सध्या कोविड रूग्णालयात 6 रुग्णांवर उपच...

CORONA ALERT NEWS 27.4.2020

Image
‘साहब… आपने हमारी बहोत खिदमत की..’! ·        रूग्णालयातून सुट्टी झालेल्या व्यक्तीने व्यक्त केल्या भावना ·        आज एकाला दिली सुटी बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : कोरोना बाधीत होने के बाद हमे यहा लाया गया…  यहा पे हमारी अच्छी खिदमद की गई..अल्लाह की दुआँसे आज सब ठिक हुआ.. यहॉ के डॉक्टर्स, स्टाफ ने हमारी बहोत खिदमद की.. डॉक्टर साहब ने भी हमे हमारा बहोत ख्याल रखा.. पुरा मुल्क इस बिमारी से मुक्त हो जायगा.. अशा भावना कोरोनातून वाचलेल्या व आज कोविड रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या व्यक्तीने व्यक्त केल्या.         जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज एका रूग्णाची  भर पडली आहे. आज...

DIO BULDANA NEWS 25.4.2020

Image
पवित्र रमजान महिन्यातही एकत्र येवून नमाज अदा करू नये -            जिल्हाधिकारी बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :   कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. रमजान महिन्यात मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्यस्थिती विचारात घेता मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्य व जीवनाच्या हिताचे आहे. त्यामुळे समाज बांधवांनी एकत्र येवून नमाज अदा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुमन चंद्रा यांनी केले आहे....

GOOD NEWS DIO BULDANA 25.4.2020

Image
आनंदवार्ता : बुलडाणा जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे ‘चवथे पाऊल..’! ·          चिखली, दे.राजा व मलकापूर येथील रूग्ण झाले बरे ·          टाळ्यांच्या निनादात रुग्णांना सोडले घरी बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :   कोरोनाचा संसर्ग जगभर वेगाने वाढत आहे. भारतातही काही हॉट स्पॉट क्षेत्रात विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. जिल्ह्यातही विषाणूने आपला संसर्ग दाखवित 21 रूग्ण आपल्या कवेत घेतले. मात्र जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात येत आहे. कोरोनाला मर्यादेत ठेवण्यात प्रशासन विविध उपाययोजना अंमलात आणत आहे. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे आता चवथे यशस्वी पाऊल पडले आहे.  ठणठणीत बरे झाल्याने व कोरोना निगेटीव्ह अहवाल इाल्यामुळे जिल्ह्यातील तीन रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुटी देण्यात आली.         जिल्ह्यात चिखली येथे तीन,    चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,    सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे...