Tuesday 8 August 2017

NEWS 8.8.2017 DIO BULDANA

लोकशाही दिन कार्यवाहीत 7 तक्रारी प्राप्त

     बुलडाणा, दि.8 :  जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यवाहीचे आयोजन आज 8 ऑगस्ट 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या लोकशाही दिनामध्ये एकूण 7 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी लोकशाही दिन कार्यवाहीसाठी एक तक्रार स्वीकृत करण्यात आली. तसेच 6 तक्रारी सामान्य तक्रार म्हणून अन्य विभागांकडे पाठविण्यात आल्या. लोकशाही दिन कार्यवाहीमध्ये दोन तक्रारी निकाली काढण्यात आल्या.  लोकशाही दिन कार्यवाही निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
    याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे, नगर रचनाकार ए. के जोशी आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  लोकशाही दिन कार्यवाहीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        *****
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीला मतदान उत्साहात
·        एकूण 306 मतदार, स्त्री मतदार 204 पुरूष 157 मतदार
·        जिल्ह्यात 97.23 टक्के मतदान

     बुलडाणा, दि.8 :  जिल्हा नियोजन समिती निवडणूक – 2017 साठी आज 8 ऑगस्ट 2017 रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. या निवडणूकीसाठी 14 मतदान केंद्रांची व्यवस्था होती. त्यामध्ये बुलडाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र होती. त्यापैकी एक जिल्हा परिषद सदस्य मतदारांकरीता, तर एक नगर परिषद सदस्य मतदारांकरीता होते. संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात नगर परिषद सदस्य   मतदारांकरीता  मतदान केंद्राची व्यवस्था होती. जिल्ह्यात एकूण 97.23 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
  या निवडणूकीकरीता स्त्री 204 व पुरूष 157 मतदार होते. अशाप्रकारे एकूण मतदारसंख्या 361 होती. त्यापैकी बुलडाणा (नागरी), चिखली, दे.राजा, सिं.राजा, लोणार, मेहकर, खामगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद, नांदुरा, मोताळा व मलकापूर मतदान केंद्रावर 100 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मात्र मोताळा 94.12, शेगांव 96.30 व बुलडाणा (ग्रामीण) येथे 86.60 मतदानाची नोंद करण्यात आली.
  मतदान केंद्र, मतदान केलेले पुरूष व स्त्री मतदार संख्या पुढीलप्रमाणे : बुलडाणा (ग्रामीण) : स्त्री- 29, पुरूष 23, बुलडाणा (नागरी) : स्त्री 18 व पुरूष 11, चिखली : स्त्री 14 व पुरूष 13, दे.राजा : स्त्री 12 व पुरूष 7, सिं.राजा : स्त्री 10 व पुरूष 7, लोणार : स्त्री 9 व पुरूष 8, मेहकर : स्त्री 13 व पुरूष 12, खामगांव : स्त्री 18 व पुरूष 16, संग्रामपूर : स्त्री 9 व पुरूष 8, जळगांव जामोद : स्त्री 10 व पुरूष 9, नांदुरा : स्त्री 15 व पुरूष 9, मलकापूर : स्त्री 14 व पुरूष 15, मोताळा : स्त्री 10 व पुरूष 6,  शेगांव : स्त्री 15 व पुरूष 11.  

                                                                                    ********
                                                राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधीसाठी प्रस्ताव आमंत्रित
·        24 ऑगस्ट 2017 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सादर करावे

     बुलडाणा, दि.8 :  भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वीत  असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी व असमान निधी देण्यात येतो. हा निधी ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी देण्यात येतो. यासंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावर उपलब्ध करून घ्यावा. ग्रंथालयांनी समान निधी व असमान निधी योजनेसाठी विहीत पद्धतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेमधील प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 24 ऑगस्ट  2017 पर्यंत पोहचतील, अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष जाधव यांनी केले आहे.
     समान निधी योजनेमध्ये सन 2016-17 साठी सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार/बांधणीकरीता कमाल 10 लाख रूपये मर्यादेत अर्थसहाय्य  देण्यात येते. तर असमान निधी योजनेमध्ये 2016-17 व 2017-18 करीता ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार करण्याकरीता अर्थसहाय्य देण्यात येते. सार्वजनिक ग्रंथालयातील बाल विभाग, महिला विभाग, ज्येष्ठ नागरिक, नवसाक्षर, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते.  तसेच बल विभाग स्थापन करण्याकरीता, 50,60,75,100,125 व 150 वे वर्ष साजरे करण्याकरीता, शारिरीकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी विभाग स्थापन करण्याकरीता ग्रंथालयांना अर्थसहाय्य देण्यात येते, असे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
                                                                        **************
जिल्हा ग्रंथालयात 12 ऑगस्ट रोजी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

     बुलडाणा, दि.8 :  ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शि. रा. रंगनाथन यांचा 12 ऑगस्ट हा जन्मदिवस असल्यामुळे या दिवशी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांच्याहस्ते केल्या जाणार आहे. या प्रदर्शनीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथपाल सतिष जाधव यांनी केले आहे.
                                                            ***********
भारतीय सैन्यदलात अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी
·        29 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर 2017 दरम्यान मोफत प्रशिक्षण वर्ग
·        प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी 21 ऑगस्ट 2017 रोजी मुलाखतीचे आयोजन
बुलडाणा, दि‍.8 -  भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत 19 नोव्हेंबर 2017 रोजी कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेची जाहीरात संघ लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.ic.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार या परीक्षेकरीता अर्ज करण्याची शेवटची तारिख 8 सप्टेंबर 2017 आहे. कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस या परीक्षेची तयारीसाठी राज्य शासनामार्फत 29 ऑगस्ट  ते 11 नोव्हेंबर 2017 दरम्यान मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नासिक रोड, नाशिक येथे होणार आहे. या प्रशिक्षणासाठी निवास, प्रशिक्षण व भोजनाची सोय विनामूल्य करण्यात आलेली आहे.
  या प्रशिक्षणासाठी इच्छूक असलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन 21 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. या मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने पदवी पर्यंतच्या शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिकेच्या मूळ प्रती व छायांकित प्रती, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरची प्रिंट सोबत आणावी. मुलाखतीचे वेळी वस्तुनिष्ठ पद्धतीची लेखी परीक्षा व तोंडी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडून घेतली जाईल.
    मुलाखतीला येण्याआधी उमेदवाराने पीसीटीसी ट्रेनिंग च्या गुगल प्लस वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.com  या संकेतस्थळावरील रिक्रुटमेंट टॅबला क्लिक करून त्यामधील उपलब्ध चेक लीस्ट व महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करावे. त्यांची दोन प्रतींमध्ये प्रींट काढून घेवून दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करून त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते भरून आणावे. अधिक माहितीसाठी 0253-2451031 व 0253-2451032 क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
************



No comments:

Post a Comment