Posts

Showing posts from June, 2023

DIO BULDANA NEWS 28.06.2023

  परिवहन विभागाचे तालुका शिबीर जाहिर बुलडाणा , दि. 28 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जुलै ते डिसेंबर 2023 दरम्यान तालुका स्तरावर घेण्यात येणारे शिबीर जाहिर केले आहे. त्यानुसार आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिन्यातून एक किंवा दोन वेळा शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात जळगाव जामोद 5 जुलै, शेगाव 7 आणि 28 जुलै, मेहकर 10 आणि 31 जुलै, खामगाव 12 आणि 26 जुलै, चिखली 17 जुलै, देऊळगाव राजा 19 जुलै, लोणार 20 जुलै, नांदुरा 21 जुलै, मलकापूर 13 आणि 27 जुलै, सिंदखेड राजा 24 जुलै रोजी घेण्यात येतील. ऑगस्ट महिन्यात जळगाव जामोद 4 ऑगस्ट, शेगाव 7 आणि 28 ऑगस्ट, मेहकर 9 आणि 31 ऑगस्ट, खामगाव 11 आणि 25 ऑगस्ट, चिखली 17 ऑगस्ट, देऊळगाव राजा 18 ऑगस्ट, लोणार 21 ऑगस्ट, नांदुरा 23 ऑगस्ट, मलकापूर 14 आणि 29 ऑगस्ट, सिंदखेड राजा 24 ऑगस्ट रोजी घेण्यात येतील.   सप्टेंबर महिन्यात जळगाव जामोद 4 सप्टेंबर, शेगाव 5 आणि 21 सप्टेंबर, मेहकर 7 आणि 27 सप्टेंबर, खामगाव 8 आणि 25 सप्टेंबर, चिखली 12 सप्टेंबर, देऊळगाव राजा 14 सप्टेंबर, लोणार 15 सप्टेंबर, नांदुरा 18 सप्टेंबर, मलकापूर 11 आणि 29 सप्...

DIO BULDANA NEWS 27.06.2023

Image
  परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन बुलडाणा , दि. 27 : राज्य शासनाकडून राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 वि द्यार्थ्यां ना  परदेशात  पदवी , पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे , या साठी शिष्यवृत्ती दे ण्या त येते. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे त .     विहित न मुन्या तील अर्ज , प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला येथे उपलब्ध आहे. दि . 30 जून 2023 प र्यं त विहित न मुन्या तील अर्ज परि पूर्ण भरून कार्यालय प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला  येथे सादर करावे लागणार आहे . अर्ज करण्या रि ता आवश्यक असलेली पात्रता , अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला , यांच्या कार्यालयाच्या सू चना फलकावर उपलब्ध आहे , असे प्रकल्प अधिकारी , एका त्मि क आदिवासी विकास प्रकल्प , अकोला यांनी कळविले आहे. 00000 नेहरू युवा केंद्रात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी बुलडाणा , दि. 27 : नेहरू युवा कें द्रा मध्ये छत्रपती शाहू...

DIO BULDANA NEWS 26.06.2023

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन बुलडाणा, दि. २६ : छत्रपती राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, अधीक्षक प्रिया सुळे, नाझर गजानन मोतेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. 00000 समाज कल्याण कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा बुलडाणा, दि. २६ : राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त समाजकल्याण कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा परिषद, समाज कल्याण यांच्या वतीने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे रॅली, तसेच समता दिंडी काढण्यात आली. तसेच नशामुक्तीबाबत चित्र प्रदर्शन उभारण्यात आले. रॅली आणि समता दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी ...