DIO BULDANA NEWS 31.03.2023
सोमवारी लोकशाही दिन ाचे आयोजन बुलडाणा, दि. 31 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ाचे आयोजन करण्यात येते. मार्च महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे. लोकशाही दिन ानंतर शासकीय योजनांची जत्रा, समन्वय समितीच्या अनुषंगाने विभागप्रमुखांशी चर्चा, आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा, लोकसेवा हक्क प्रकरणांचा आढावा, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तक्रारींचा आढावा घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे. 00000 ढासाळवाडी, वरवंडसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर बुलडाणा, दि. 31 : बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी आणि वरवंड या दोन गावांसाठी पिण्याचे पाणी पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. ढासाळवाडी येथील लोकसंख्या 1 हजार 173 असून पशूधन 850 आहे. गावाला एका टँकरद्वारे दररोज 18 हजार 460 लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच वरवंड येथील लोकसंख्या 6 हजा...