Posts

Showing posts from 2023

जिल्ह्यातील 1420 गावांची 50च्या आत अंतिम पीक पैसेवारी

   बुलडाणा,दि.29(जिमाका): जिल्ह्यातील सन 2023-24 या खरीप हंगामातील एकूण 1420 गावांची अंतिम पीक पैसेवारी 50 पैशाच्या आत जाहीर झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.   तालुक्यातील गावे आणि अंतिम पैसेवारी ही पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये नांदुरा तालुक्यातील 112 गावांची पैसेवारी ही 44 असून, जळगाव जामेाद तालुक्यातील 119 गावांची पैसेवारी 45 तर मलकापूर तालुक्यातील 73 गावांची पैसेवारी 46 आहे. बुलडाणा 98, मेहकर 161, मोताळा 120, खामगाव 146, शेगाव 73 आणि संग्रामपूर तालुक्यातील 105 गावांची पैसेवारी ही 47 आहे. चिखली तालुक्यातील 144, देऊळगाव राजा 64, लोणार 91 आणि सिंदखेड राजा तालुक्यातील 114 गावांची पैसेवारी ही 48 आली आहे. सर्व तालुक्यातील गावांची पैसेवारी सरासरी 47 असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी कळविले आहे. *****

सामाजिक न्यायभवनात महामंडळांच्या कार्यालयांचे स्थलांतर

बुलडाणा,दि.29(जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि  लिंगायत समाजासाठी जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार झाली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे.            या मंडळमार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ , पहिला मजला , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , चिखली रोड , त्रिशरण चौक , बुलढाणा दूरध्वनी क्र.07262-248285 येथे संपर्क साध ण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे . झेड. राठोड यांनी केले आहे. *****

बुलडाणा येथे 5 जानेवारीपासून विविध प्रशिक्षणाचे आयोजन

बुलडाणा,दि.29(जिमाका): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रद्वारा जिल्हा उद्योग केंद् रा मार्फत उद्योग , व्यवसाय सुरु करू इच्छिणारा सुशिक्षित बेरोजगार युवक - युव तीं साठी बुलडाणा येथे 5 ते 9 जानेवारीदरम्यान शेळीपालन, कुक्कट पालन, गाय - म्है स पालन अशा पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवक-युवतींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.                        सुशिक्षित बेरोजगा रांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत : चा उद्योग - व्यवसाय सुरु करावा हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असून, या कालावधीत शेळी , कु क्कु ट आणि गाय - म् हशी पालनाचे तंत्र आणि प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चा ऱ्याचे प्रकार व उद्योग सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन आणि सहकार्य   तसच विविध शासकीय योजनांची माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. या ...

प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची संधी

  बुलडाणा,दि.29(जिमाका): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांनी काही कारणास्तव प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरले नाहीत, त्यांनी 1 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत आपले अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा. 1 ते 5 जानेवारी 2024 या कालावधीत संबंधित योजनेसाठी पुन्हा खिडकी उघडण्यात येत असून, अर्ज न भरलेल्या माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमातांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉ.लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे. ******

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गंत जिल्ह्यात मेळाव्यांचे आयोजन

  बुलडाणा,दि.29(जिमाका): विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालयाकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना गतिमानता पंधरवडा घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत सन 2023-24 या वर्षाच्या उद्दीष्टपूर्तीच्या उद्देशाने जिल्ह्यात तालुकानिहाय सीएमईजीपी मार्गदर्शन, माहिती मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक युवती, संभाव्य नवउद्योजक, एफपीओ संघटना, बँकर्स, महिला बचत गटांना सहभागी होण्यासाठी आवाहन आले असून, या मेळाव्यामध्ये लाभार्थी निवड करुन सीएमईजीपी पोर्टलवर प्रस्ताव अपलोड करण्याची सुविधा ठेवण्यात आली आहे. आपली आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे. हे मेळावे एमएसआरएलएम, रेसिडेन्सी आणि शाहु कॉलेज, बुलढाणा येथे तर आयटीआय कॉलेज संग्रामपूर, माविम सीएमआरसी केंद्र आणि इंजिनियअर कॉलेज शेगाव, एनयुएलएम नगर परिषद सभागृह खामगाव, आयटीआय कॉलेज सिंदखेड राजा, एमएसआरएलएम, पंचायत समिती सभागृह, मेहकर, आयटीआय कॉलेज चिखली, कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर, माविम सीएमआरसी क...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

    बुलडाणा,दि.29(जिमाका): राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये 102 गुन्हे नोंदविण्यात आले असून,  101 वारस, एक बेवारस गुन्हे नोंदवून तब्बल 108 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 16 दुचाकी व एका ऑटोसह एकूण 28 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी 615 तर विदेशी मद्य 78 लिटर, ताडी 42  आणि रसायन (सडवा) 28 हजार 486, हातभट्टी 1041 व बिअर 11.7 लिटर मद्य पकडण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत धामणगाव बढे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सिंदखेड लपाली येथील गोपाल दगडु मुंडाळे याच्या घरातून 10 किलो गांजा व गुगळी शिवारात अंदाजे 32 किलो गांजाची झाडे असा एकूण 42 किलोचा साठा पकडला. या प्रकरणी गोपाल मुंडाळे याला अटक केली असून, त्याला 4 जानेवारी 2024पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक नयना देशमुख यांनी नुकतीच मेहकर येथील ...

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेच्या विविध योजनांसाठी अर्ज करावेत

  बुलडाणा,दि.29(जिमाका): केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनांचा सन 2022-23 व 2023-24 वर्षाच्या गट अ निहाय प्रारुप आराखडा वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचे अर्ज 1 ते 19 जानेवारी 2024 या कालावधी अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील उमेदवारांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला येथे करावेत, असे आवाहन असे आवाहन मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.     या योजनांची यादी व योजनानिहाय अर्ज प्रकल्प कार्यालय अकोला येथे उपलब्ध असून, वैयक्तिक लाभाच्या योजना 85 टक्के अनुदानावर काटेरी तार, खाद्य स्टॉल, पिठगिरणी, शिवणयंत्र, ताडपत्री, वनहक्क जमीन प्राप्त शेतकऱ्यांकडून तार जाळी, ताडपत्री इ. तसेच आदिवासी महिला व पुरष बचत गटांकडून रेडीमेट होजीअरी गारमेंट या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांकडे अनुसूचित जमातीचा दाखला, रहिवाशी दाखला, आधारकार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र व योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक, निधी व आवश्यक कागदपत...

निवृत्तीवेतनधारकांनी करबचतीचा 10 जानेवारीपर्यंत तपशील सादर करावा

  बुलडाणा,दि.29(जिमाका): सर्व निवृत्तीवेतन धारकांनी 2023-24 या आर्थिक वर्षात आयकर निर्धारण करण्यासाठी त्यांनी केलेल्या बचतीचा तपशिल दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत कोषागार कार्यालय बुलढाणा येथे कळवावा अन्यथा आपल्या उत्पन्नानुसार कर निर्धारण करून टी. डी. एस. कपात करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. तरी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी बचतीचा तपशील व पॅन कार्डची छायांकित प्रती जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ******

‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

    बुलडाणा,दि.29(जिमाका): दिव्यांगांनी स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र दिव्यांगांकडून 4 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.   दिव्यांगांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांगांना, त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा मुख्य हेतू असून, दिव्यांगांना   https://evehicleform.mshfdc.co.in   येथे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी   योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.   ******

नवमतदारांनी विशेष पुनरीक्षण यादी कार्यक्रमात नावनोंदणी करावी - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

  नवमतदारांना नावनोंदणीसाठी आता 5जानेवारीपर्यंत सुवर्णसंधी   बुलडाणा, दि.29(जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा सुधारित विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, आता यामध्ये नवमतदारांना नावनोंदणी करण्यासाठी 5 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.   भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या 27 डिसेंबर 2023 च्या पत्रानुसार सुधारित पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार दिनांक 5 जानेवारी 2024 पर्यंत सर्व नागरीक आपले मतदार नोंदणी अर्ज Online स्वरुपात   https://voters.eci.gov.in   व voter helpline app चा वापर करून सादर करू शकतात किंवा ऑफ...

कृषि विभागातंर्गंत साहित्य पुरवठ्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

  ·          जिल्हा परिषद बुलडाणा सेसफंड योजना सन 2023-24 बुलडाणा, दि. 04(जिमाका): जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेतून 75 टक्के अनुदानावर 5अश्वशक्ती विद्युत मोटरपंप संच, पॉवर स्प्रेअर्स, मानवचलीत टोकनयंत्र तसेच रोटाव्हेटर, बीबीएफ प्लाटर, बियाणे खते पेरणी यंत्र आदी (40,000 रुपयांच्या मर्यादेत) साहित्य पुरविणे प्रस्तावित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज बोलावण्यात येत आहेत. तरी इच्छुक शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमधील कृषि विभागात कृषि अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी आवाहन केले आहे. *****  

मतदारयादीत नाव नोंदवून लोकशाही बळकटीकरणास हातभार लावा - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील

  बुलडाणा,दि.04(जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, लोकशाही तत्वावर आधारित देश आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी आपण सर्व मतदार बहुमूल्य मताच्या आधारे लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळकट करण्याचे काम करतात. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे काम केले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम मतदार यादीत नाव नोंदवून घेत लोकशाही बळकटीकरणास हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. सध्या भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरु असून, जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदार यादी पुनरिक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवक-युवतींनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करावे जेणेकरून   आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आवाहनातून सांगितले आहे.       आपले नाव आजच मतदार यादीमध्ये नोंदवावे. आपले ना...

फळ व रब्बीतील पिकांचा विमा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ

  बुलडाणा, दि. 04(जिमाका): राज्यात विमा योजना अंतर्गत 2023-24 मध्ये संत्रा व रब्बी हंगामातील ज्वा री पिकासाठी आणि कोकणातील आंबा आणि काजू फळपिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्या साठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषि विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेत सह भा गी होता यावे, यासाठी कोकणातील आंबा , राज्यातील काजू , व संत्रा आणि रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने 05 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले ले इच्छुक शेतकरी फळ पिकांसाठी 05 डिसेंबर 2023 पर्यंत विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. याचा राज्यातील आंबा , काजू , संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरीत भागातील आंबा फळ पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 असा नियमित आहे तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग...

राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी - पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

Image
  •  पालकमंत्री दिलीप वळसे पाटील शेतक-यांच्या थेट बांधावर • कृषि विभागाकडून घेतला आढावा • आसोला जहांगीर येथे छत उडालेल्या नागरिकांना सानुग्रह राशीचे वाटप • नुकसानग्रस्त भागाचे ता़त्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश • आधार प्रमाणीकरण पुन्हा सुरु होणार • पिक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु बुलडाणा, दि.03(जिमाका):  जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासन नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात  अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील सावरगाव माळ, गोळेगाव, गिरोली, आसोला जहाँगीर आणि पळसखेड चक्का या नुकसानग्रस्त भागाचा पालकमंत्र्यांनी आज दौरा करून पाहणी केली.   आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी,   निवासी उपज...

नागरिकांनी महा ई-सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

  बुलडाणा,दि.02(जिमाका): राज्य शासनाच्या विविध सेवा, योजनांचा‌ लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी -विद्यार्थिनी, विविध शासकीय योजनांस पात्र लाभार्थी यांनी नजिकच्या आपले ई सेवा केंद्र, बँक, पोस्ट ऑफिस येथे जावून आपापल्या खात्यांचे मोबाईल नंबर, आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण (ईकेवायसी) करून घ्यावे; जेणेकरून विविध शासकीय योजनांचा लाभ थेट बँक खात्यात हस्तांतरित होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासन संबंधित यंत्रणेमार्फत त्यांचे पंचनामे करत आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त मदतीसाठी शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण (ekyc) करण्याकरिता जिल्ह्यातील कार्यान्वित तालुकानिहाय आपले सरकार सेवा केंद्रांची यादी खालील लिंक वर उपलब्ध आहे.   https://buldhana.nic.in/ तसेच DIT आधार केंद्र यादी सुद्धा उपलब्ध असून, जिल्ह्यात एकूण 680 आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. तसेच 86 DIT आधार केंद्र कार्यान्वित आहे. तरी वंचित लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील नजीक...

मतदान नवीन मतदार नोंदणीवर विशेष भर द्या - विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय

Image
  ·          सहायक निवडणूक अ‍धिकारी यांच्याकडून घेतला कामाचा आढावा ·          एकही नवीन मतदार नोंदणीपासून सुटू नये ·          विशेष शिबिराच्या माध्यमातून नोंदणी वाढविण्याचे दिले निर्देश ·            मतदार नाव नोंदणी प्रक्रियेस गती द्या बुलडाणा,दि.30(जिमाका): आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, सध्या भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या विशेष मोहिमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवीन मतदारांकडून फॉर्म क्रमांक 6 भरून घेत त्यांची नावनोंदणी करून घेण्यावर भर देण्याचे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय मतदार यादी पुनरीक्षणाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.       ...

मतदान केंद्रांची डॉ. निधी पांण्डेय यांच्याकडून पाहणी

Image
  बुलडाणा, दि. 30 (जिमाका): दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली.              जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधा र) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. पांण्डेय यांनी श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 182, 183 आणि 184ची पाहणी करत केंद्रप्रमुखांकडून मतदार यादी पुनरीक्षण आणि नवीन मतदार नावनोंदणी, वगळणी, मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत चर्चा केली. तसेच जिजामाता महाव...

मतदार नोंदणी वाढविण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही मदत घ्या - मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय

Image
  बुलडाणा, दि.30(जिमाका):   दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, त्यानुसार जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही मतदार नोंदणीमध्ये मदत घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दि ले. श्रीमती डॉ. पांण्डेय या मतदार यादी निरीक्षक म्हणून त्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.   जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यासह माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व विविध पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात विशेष शिबिरांमधून नव मतदारांची जिल्हा प्रशासन आणि नि...

दत्तक विधान प्रक्रिया समजून घ्या – जिल्हा बाल संरक्षण अ‍धिकारी

  बुलडाणा, दि. 30(जिमाका):   बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.              भावी दत्तक माता हे शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असणे आवश्यक आहे. सदर दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नीची सहमती असणे आवश्यक आहे. एकल महिला दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडू शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतो. बाळ दत्तक घेणेसाठी बालकाचे वय 2 वर्षाच्या आत असावे. भावी दत्तक माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 85 वर्ष, एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष असावी.   बालकाचे वय 2 वर्ष ते 4 वर्षापर्यंतचे बालक, भावी दत्तक माता पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तीक 90 वर्ष, एकल भावी माता, पिता यांची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असावी...

शासकीय मुलींचे वसतीगृहात दूध पुरवठ्यासाठी दरपत्रक आमंत्रित

बुलडाणा, दि. 30(जिमाका):   समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह (जुने, नवीन) बुलडाणा वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींना दररोज प्रती विद्यार्थिनी 200 मिली साखरयुक्त दूध पुरवठा करण्याकरिता स्थानिक पातळीवरून निवेदिता मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी शासन नियमांच्या अधिन राहून दि. 1 ते 6 डिसेंबर 2023 पर्यंत बंद पाकीटात वसतीगृहाच्या कार्यालयात या निवेदिता सादर कराव्यात असे आवाहन, शासकीय मुलींचे वसतीगृहाचे अधीक्षक यांनी केले आहे. ******

सैलानीबाबा यात्रेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

Image
·           यात्रा समन्वय समितीची पूर्वतयारी आढावा बैठक ·           यंत्रणेमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना ·          मुबलक पाणी, अखंड वीजपुरवठा करण्याचे दिले निर्देश बुलडाणा, दि. 29 ‍(जिमाका): जिल्ह्यात 15 मार्च 2024 पासून पिंपळगाव सराई परिसरात सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित जिल्हा यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून, त्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि नियोजनानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज येथे दिले.     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृह येथे आयोजित यात्रेच्या पूर्वतयारीचा समन्वय समितीतील सदस्यांचा त्यांनी आज आढावा घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबा दर्गा परिसरात यात्रा महोत्सव राहणार असून, त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन, दर्गा ट्रस्ट आणि पिंपळगाव सराई ग्रामपंचायत ...

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हा अन् 35 टक्के अनुदान मिळवा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

  बुलडाणा, दि. 29 ‍(जिमाका): प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत उन्नयन योजना ही संघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शासनाने सुरू केली आहे. या योजनेत 'एक जिल्हा, एक उत्पादन' आणि नाशवंत शेतीमाल उद्योगासाठी 10 लाखांच्या मर्यादेत 35 टक्क्यांपर्यंत अनुदान कृषी विभागाद्वारे दिले जात आहे. या योजनेद्वारे शेतकरी विकास साधणार आहेत. त्यामुळे या योजनेत सहभागी होऊन 10 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत 35 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, असे आवाहन जिल्हा‍धिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.   असंघटित अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये खूप अडचणी आहेत. ज्यामध्ये संबंधित उद्योजक बाहेरून कर्ज घेण्यास पात्र नाहीत, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा जास्तीचा खर्च व मानांकनाचा अभाव असतो. त्यामुळे सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये संत्रा, डाळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामार्फत ...