DIO BULDANA NEWS 30.09.2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आज जिल्हा दौरा बुलडाणा, दि. 30 : पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवार, दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता मेहकर येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. दुपारी 11.30 वाजता चिखली येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता जळगाव जामोद येथील जाहीर सभेस उपस्थित राहतील. सायंकाळी 5.30 वाजता भुसावळकडे प्रयाण करतील. 00000 जमिनविषयक ऑनलाईन नोंदीबाबत कार्यशाळा *ई-चावडी, ई-हक्काबाबत मार्गदर्शन बुलडाणा, दि. 30 : जिल्ह्यातील जमिनविषयक नोंदी ऑनलाईन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा पार पडली. यात ई-महाभूमी प्रकल्पाच्या वतीने ई-चावडी, ई-हक्क आदींबाबत माहिती देण्यात आली. यात ई-महाभूमी फेरफा रप्रकल्पाच्या राज्य समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, सहआयुक्त श्यामकांत मस्के, श्री. नाईक उपस्थित होते. श्रीमती नरके यांनी महसुलविषयक घेण्यात येणाऱ्या जमिनीच्या नोंदीची माहिती दिली. या नोंद...