DIO BULDANA NEWS 25.08.2022
शेतकऱ्यांनी पिवळा मोझॅकची उपाययोजना करावी *कृषि विभागाचे आवाहन बुलडाणा, दि. 25 : सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. सोयाबीन पिकावर सोयबीन पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरवातीच्या अवस्थेत फक्त काही झाडांवरच हा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु नंतर मात्र पांढऱ्या माशीमुळे रोगाचा प्रसार होतो. संपूर्ण पिक सोयाबीन पिवळा मोझॅकला बळी पडू शकत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिवळा मोझॅकने ग्रस्त झाडे तात्काळ उपटून घ्यावी आणि नष्ट करावी, एकरी १५ ते २० पिवळे चिकट सापळे लावावेत. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायमीथोक्झाम १२.६० टक्के अधिक लँबडा सायहँलोथ्रोन ९.५० टक्के झेडसी @ २.५ मिली प्रती १० लिटर पाणी हे व्यापारी नाव अलीका किंवा बितासायफ्लूथ्रोन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के @ ७ मिली प्रती १० लिटर पाणी हे व्यापारी नाव सोलोमोन किटकनाशकाची तात्काळ फवारणी करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी...