DIO BULDANA NEWS 30.9.2021
पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पुर्वसूचना द्यावी • प्रधानमंत्री पीक विमा योजना • कृषि विभागाचे आवाहन बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जिल्ह्यात 25 ते 29 सप्टेंबर 2021 या कालावधीत गुलाब चक्रीवादळामुळे पूर आल्याने क्षेत्र जलमय होवून शेतामध्ये पाणी घुसले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी व मका या पिकांचे क्षेत्र बाधीत झाले आहे. त्याअनुषंगाने पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत तात्काळा विमा कंपनीला तक्रार दाखल करावी. शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विमा कंपनीस सर्वप्रथम 18001024088 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नुकसानीबाबत ऑनलाईन तक्रार दाखल कर...