Posts

Showing posts from September, 2020

DIO BULDANA NEWS 30.9.2020

Image
  अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी -            पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे अतिवृष्टीमुळे नुकसान मदतीसंदर्भात घेतला आढावा एनडीआरएफमधून 50 टक्केपेक्षा जास्त बाधीत क्षेत्राला मदत मिळवून द्यावी बुलडाणा, (जिमाका) दि. 30 :   जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.  त्याचप्रमाणे पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 100 टक्के मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून तेवढाच महत्वाचा आहे, त्यामुळे गांभीर्याने याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.    जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन 29 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होत...

DIO BULDANA NEWS 29.9.2020

Image
  जल जिवन आराखड्यातील कामे दर्जेदार करावीत -            पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जल जिवन मिशनची आढावा बैठक बुलडाणा, (जिमाका) दि. 29 :  शासनाने प्रत्येक गाव, वाडी व वस्त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी जल जिवन मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक घराला दरडोई दररोज 55 लीटर पाणी प्रत्येक कुटूंबाला पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार या मिशनमध्ये नवीन नळयोजना प्रस्तावीत कराव्यात. मिशनमधील आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या योजनांची कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.   स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात  जलजीवन मिशन आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते. तसेच सभागृहात  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घोडे, उपविभागीय अभियंता एस आर वारे, पी एल ...

DIO BULDANA NEWS 27.9.2020

 माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम कोरोना विरूद्ध निर्णायक ठरेल                                                                                    - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  *जिल्हयाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा बुलडाणा, (जिमाका) दि. 27:  सध्या उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा, मनुष्यबळ यावर कोरोनाविरुद्ध लढा द्यावयाचा आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधेवर ताण येणार नाही, यासाठी राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज...

DIO BULDANA NEWS 25.9.2020

                                        पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.                                                ***""""****                              कोरोना अलर्ट : प्राप्त 695 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 151 पॉझिटिव्ह • 121 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका)दि.25: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी ...

DIO BULDANA CORONA ALERT 23.9.2020

  कोरोना अलर्ट : प्राप्त 455 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 64 पॉझिटिव्ह • 87 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका)दि.23 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 519 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 455 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 64 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 व रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 341 तर रॅपिड टेस्टमधील 114 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 455 अहवाल निगेटीव्ह आहेत.             पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :    खामगांव शहर : 10, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, बोरजवळा 1,  गारडगांव 1, घाटपुरी 2, नांदुरा शहर : 9, नांदुरा तालुका :येरळी 2, खुमगांव 1, निमगांव 1, भुईशिंगा 1, माळेगांव गोंड 1,  जळगांव जामोद शहर : 2, चिखली शहर: 2, चिखली तालुका : खंडाळा 1, मेरा खु 1,  मेहकर शहर : 1, बुलडाणा शहर : 3,  मलकापूर तालुका : दाताळा 1, भानगुरा 1, अनुराबाद 1, दे.र...

DIO BULDANA NEWS 22.9.2020

  कोरोना अलर्ट : प्राप्त 554 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 129 पॉझिटिव्ह 176 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका)दि.22  :   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 683 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 554 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 129 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये   प्रयोगशाळेतील 115 व रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 421 तर रॅपिड टेस्टमधील 133 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 554 अहवाल निगेटीव्ह आहेत.       पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :   खामगांव शहर : 16, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1, आंबेटाकळी 3,   नांदुरा तालुका : बेलोरा 1, येरळी 1, जळगांव जामोद शहर : 4, मोताळा तालुका : कोथळी 1, लोणार तालुका: वडगांव 1,चिखली शहर : 8,चिखली तालुका : मेरा खु 1, ब्रम्हपूरी 7, हिमळ 1, शिंदी हराळी 1, अंबाशी 2, पेठ 1, बुलडाणा शहर : 17, मलकापूर तालुका : धरणगांव 1, दाताळा 2, मलकापूर शहर : 12, शेगांव शहर...

DIO BULDANA NEWS 21.9.2020

जिल्ह्यात मुसळधार…! सरासरी 29.1 मि.मी पावसाची नोंद सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी, 69.6 मि.मी पाऊस दोन तालुक्यांनी पर्जन्यमानाची गाठली शंभरी बुलडाणा, (जिमाका) दि.21  :    गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात दमदार, तर कुठे मध्यम, कुठे तुरळक अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून आले आहे. यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन, ज्वारी, मका, तीळ या पीकांचे नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसाने शेतात पाणी थांबल्यामुळे कापूस पीकावरही विपरीत परीणाम होत आहे. जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात सर्वात जास्त 69.6 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून ही अतिवृष्टी आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 29.1 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मलकापूर तालुक्यात 103.58 टक्के व सिंदखेड राजा तालुक्यात 102 टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यांनी पावसाची शंभरी गाठली पाच तालुके नव्वदीच्या पार आहे.    जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊ...