DIO BULDANA NEWS 31.12.2020
कोरोना अलर्ट : प्राप्त 483 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 32 पॉझिटिव्ह • 31 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 515 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 483 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 32 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 31 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 390 तर रॅपिड टेस्टमधील 93 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 483 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मोताळा तालुका : पिं. देवी 1, दे. राजा शहर : 8, सिं. राजा तालुका : वडजी 3, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, पातुर्डा 1, शेगांव शहर : 2, नांदुरा तालुका : खातखेड 2, पिंप्री अढाव 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : गोंधनपूर 1, गारडगांव 1, बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : शिरपूर 1,सागवन 1, ढासाळा 1 ...