news 26.7.2017 dio buldana
राष्ट्रीय निवृत्ती वेतन येाजनेचा प्रशिक्षण कार्यक्रम · जिल्हा कोषागार कार्यालयाचा उपक्रम बुलडाणा, दि. 26 - राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व अंशदाय निवृत्ती वेतन योजना प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज 26 जुलै 2017 रोजी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडला. या प्रशिक्षण कायर्क्रमाला आहरण व सवितरण अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिप प्रज्वलन करून प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे प्रशिक्षक दत्तात्रय काळे, जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर, स्थानिक निधी लेखा विभागाचे सहायक संचालक श्री. झुंजारे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, अप्पर कोषागार अधिकारी श्री. मडावी व श्रीमती स्मिता तिमसे आदी उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गामध्ये प्रशिक्षक श्री. काळे यांनी सादरीकरणाद्वारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे लाभ सांगितले. तसेच यामध्ये लाभार्थ्यांची होत असलेली गुंतवणूक समजवून सांगितली. विमा छत्र योजनेचे लाभ विषद करून सेवानिवृत्त होत असलेल्या प्रत्येक कर्मचारी ...