Posts

Showing posts from July, 2025

जिल्हास्तर नेहरू कप हॉकी स्पर्धा; सहभागासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणी करा

  जिल्हास्तर नेहरू कप हॉकी स्पर्धा; सहभागासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणी करा बुलडाणा, दि. 31 (जिमाका):   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हास्तर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सबज्युनिअर (१५ वर्षांखालील मुले), ज्युनिअर (१७ वर्षांखालील मुले व मुली) अशा गटांचा समावेश आहे.   स्पर्धेचे आयोजन दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा/संघांनी आपली ऑफलाईन नोंदणी दिनांक ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरून रोड, बुलढाणा येथे करणे आवश्यक आहे. नोंदणीसह संघांची यादी जोडणे बंधनकारक आहे. विहित मुदतीनंतर कोणत्याही संघाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (फुटबॉल) डॉ. जिवन मोहोड यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे :   पात्रता प्रमाणपत्र (Eligibility Form), ...

सुधारीत पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

सुधारीत पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा       बुलढाणा,दि.31(जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दोन दिवशीय दि. 1 व 2 ऑगस्ट 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान ते अतिवृष्टी भागाची पाहणी व नैसर्गिक आपत्ती बाबत आढावा घेणार आहे.   त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार   दि. 31 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुंबई येथून ता. लोणार जि. बुलढाणाकडे रवाना. शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी रोजी रात्री 1 वाजता शासकीय विश्रामगृह, लोणार येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोईनुसार अतिवृष्टी भागाची पाहणी.   सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे नैसर्गिक आपत्ती बाबत आढावा बैठक. बैठकीनंतर शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे आगमन व राखीव. शनिवार दि.2 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यकर्ता बैठक. त्यानंतर सोईनुसार पुणेकडे रवाना होतील. 0000000

अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधी

Image
  अल्पसंख्याक समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा- ललित गांधी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला विविध विषयाचा   आढावा; बुलडाणा, दि. 30 (जिमाका):   जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रविकास कार्यक्रमासह अल्पसंख्याकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनाचा लाभ अल्पसंख्याक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजीत बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या विचारात घेवून जिल्ह्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजे...

जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात; नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

  जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात; नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील ·          विविध कार्यक्रमांचे आयोजन ·              उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणार ·          लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व अनुदान वाटप होणार बुलडाणा, दि. 31 (जिमाका):   राज्य शासनाच्या निर्देशानुसार यावर्षी दि. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ आणि १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह २०२५’ साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या विविध कामकाजाचा आढावा घेणे, उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करणे, तसेच नागरिकांपर्यंत विभागाच्या सेवा आणि योजना पोहोचविणे, या हेतूने सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महसूल विभागाकडून समाजाच्या विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्...

नक्शा' कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन कामकाजाला सुरुवात

  नक्शा' कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन कामकाजाला सुरुवात   बुलडाणा, दि. 30 (जिमाका):    केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “ नक्शा ” कार्यक्रमाची प्रायोगिक योजनेची अंमलबजावणी बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दीत 30 जुलैपासून सुरु झाली आहे. त्यामुळे बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन भूमी अभिलेख उप अधीक्षक व्ही. ए.सवडदकर यांनी दिली आहे.   स्थानिक नागरी स्वराज्य संस्था क्षेत्रातील मूळ व विस्तारीत क्षेत्रामधील जमिनींचे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्याबाबत नक्शा हा कार्यक्रम केंद्र शासनाकडून एक वर्षाच्या प्रायोगिक तत्त्वावर बुलढाणा येथे पथदर्शी स्वरुपात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नगरपालिका हद्दीतील नगर भुमापन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी 29 जुलै रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. याकामी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी तसेच प्युरवेज इंफ्रा प्रा.लि. नगरपालिक...

जागतिक काविळ दिनानिमित्त जनजागृती रॅली

  जागतिक काविळ दिनानिमित्त जनजागृती रॅली बुलडाणा, दि. 30 (जिमाका):   जागतिक काविळ दिनानिमित्त आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या वतीने आज शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली उत्साहात पार पडली. रॅलीच्या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगटे, बाह्य रुग्ण विभाग प्रमुख, काविळ नियंत्रण कार्यक्रम प्रमुख, रक्त संक्रमण अधिकारी, आर.बी.एस.के. समन्वयक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा, आयसीयू, एन.व्ही.एच.सी.पी., तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभाग व परिचर्या केंद्राचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती होती. या रॅलीत जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य खेडेकर यांनी रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. 00000

अवयवदान चळवळ म्हणून राबवा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात 'अवयवदान पंधरवडा'

  अवयवदान चळवळ म्हणून राबवा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात 'अवयवदान पंधरवडा'   बुलडाणा, दि. 30 (जिमाका):   राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढवून अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी राज्यभरात दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान "अवयवदान पंधरवडा" उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी व्यापक जनजागृती आणि समाजाभिमुख मोहिम राबवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय नियोजन बैठकीत दिले. या बैठकीत आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका डॉ. कादंबरी बलकवडे, केईएम रुग्णालयाचे डॉ. आकाश शुक्ला, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, "अवयवदान ही एक वैयक्तिक कृती नसून, ती सामाजिक बांधिलकी आहे. ही चळवळ जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारी आणि भीती दूर करणारी असली पाहिजे. लोकांमध्ये सकारात्मक मतपरिव...

बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार; 13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार; 13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   बुलडाणा, दि. 29 (जिमाका): बुलढाणा जिल्ह्यातील 44 महसूल मंडळे आणि बुलढाणा शहर येथे एकूण 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रांसाठी महाऑनलाईनचे "आपले सरकार सेवा केंद्र" चालकांकडून अर्ज मागविण्यात येत असून, 13 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.   या प्रक्रियेसाठी जाहिरनामा, नमुना अर्ज, अटी व शर्ती, पात्र/अपात्र उमेदवारांची यादी आणि निवड प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डवर तसेच www.buldhana.nic.in   या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 30 जुलै 2025 पासून सुरू होऊन 13 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे चालू राहील. जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांत आधार किट देण्यासाठी केंद्र स्थापन केली जाणार असून, बुलढाणा (3), चिखली (6), देऊळगाव राजा (3), मेहकर (5), लोणार (3), सिं...

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा जिल्हा दौरा

  जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा जिल्हा दौरा   बुलढाणा,दि.29(जिमाका) :   जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ललित गांधी हे बुधवार व गुरुवार   दि. 30 व 31 जुलै 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता जैन स्थानक, गांधीनगर चिखली येथे समाज बांधव बैठक. त्यानंतर रात्री 10 वाजता बुलढाणाकडे रवाना. रात्री 11 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. गुरुवार दि.31 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता जैन मंदिर, स्थानिक दर्शनार्थ भेटीसाठी. सकाळी   11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख यांच्या समवेत आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन स्थळ: इतापे ले आऊट, चिखली रोड बुलढाणा. दुपारी 3.30 वाजता भगवान महावीर निर्वाण कल्याणक निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ व जैन समा पदाधिकारी यांची नियोजन भवन सभागृहात संवाद बैठक. ...

लम्पी आजारांच्या नियंत्रणासाठी पशुपालकांनी उपाययोजना राबवावी; लंपी चर्मरोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिम

  लम्पी आजारांच्या नियंत्रणासाठी पशुपालकांनी उपाययोजना राबवावी; लंपी चर्मरोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिम   बुलडाणा, दि. 29 (जिमाका):   जनावरांमध्ये झपाट्याने फैलावत असलेल्या लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुपालकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात विविध गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, पशुपालकांनी शिफारशीत उपाययोजना करून या विषाणूजन्य रोगापासून जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यसाय डॉ.अमितकुमार दुबे यांनी केले आहे. जिल्ह्यातील मलकापुर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगाव व चिखली या तालुक्यांमध्ये गोजातीय पशुधनामध्ये लंपीचर्मरोग सदृश्य लक्षणे आढळुन आलेली आहेत. लंपीचर्मरोग हा आजार विषाणुजन्य आजार असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रण वेळीच करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 60 हजार 815 गोवर्गीय पशुधन असुन 3 लक्ष 16 हजार 500 लंपीचर्मरोग प्रतिबंधक लसमात्रांचा पुरवठा उपलब्ध असून लसीकरण मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. सध्या मलकापुर, चिखली, देऊळगाव र...

मेहकर येथे 29 जुलैला विशेष मासिक शिबीर

  मेहकर येथे 29 जुलैला विशेष मासिक शिबीर   बुलढाणा,दि.28(जिमाका) : मोटार वाहन चालक व मालक यांच्या सोयीसाठी तसेच स्थानिक मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या मागणीनुसार परिवहन विभागामार्फत मंगळवार दि. 29 जुलै रोजी मेहकर तालुक्यात विशेष अतिरिक्त मासिक शिबीर दौरा आयोजित करण्यात आला आहे. या शिबिराचा वाहन चालक व मालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.   अतिरिक्त शिबिरांमध्ये वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, वाहन तपासणी, तसेच वाहन चालक अनुज्ञप्ती संबंधित सर्व कामकाज करण्यात येणार आहे. या शिबिरात मोटार वाहन निरीक्षक उपस्थित राहून संबंधित कामकाजाचे निराकरण करतील, त्यामुळे वाहनधारक, चालक व ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी याचा लाभ घ्यावा.   सर्व संबंधितांनी या शिबिराची नोंद घेऊन आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. 0000000

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन शनिवारी(2 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

  डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन शनिवारी(2 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद   बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : भारतीय डाक विभाग आपल्या सेवा प्रणालीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘आय.टी. 2.0’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत एपीटी (APT) अप्लिकेशन ही नवीन डिजिटल प्रणाली कार्यान्वित करत आहे. या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे डाक व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार असून, यामुळे पोस्ट ऑफिसमधील सेवा आणखी सक्षम होणार आहेत.   बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाखा टपाल कार्यालये व उपडाकघरांमध्ये ही प्रणाली मंगळवार दि. 5 ऑगस्ट 2025 पासून होणार होती. परंतु रक्षाबंधन सणामुळे नव्या प्रणालीची अंमलबजावणी आता सोमवार दि. 4 ऑगस्टपासून होणार आहे. या संक्रमणासाठी आवश्यक असलेल्या डेटाच्या स्थलांतराची प्रक्रिया सोमवार दि. 4 ऑगस्ट रोजी होणारी ती आता शनिवार दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी पार पडणार आहे. नागरिकानी यांची नोंद घ्यावी. तसेच शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करता येणार नसल्याने नागरिकांनी महत्त्वाची कामे...

"हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम

  "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम बुलढाणा, दि. 28 (जिमाका):   "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या अभियानाच्या अंतर्गत गुरुवार, २४ जुलै रोजी महिला व बाल विकास भवन,   येथे वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत वर्ष २०२५ साठी राज्य शासनाने घेतलेल्या १० कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टाचा एक भाग म्हणून एकूण २२ वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरणसंवर्धन व हरित महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने ही कृती महत्त्वाची ठरत आहे. कार्यक्रमास विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. यामध्ये शासकीय मुलींचे बालगृह व निरीक्षणगृह अधीक्षक सुनिल वाठोरे, परिविक्षा अधिकारी श्रीकृष्ण इंगळे व उमेश निकम, संरक्षण अधिकारी रामेश्वर वसु, दिवेश मराठे यांचा सहभाग होता. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी तसेच चाईल्ड हेल्पलाइन समन्वयक सोहेप शेख व कनिष्ठ काळजी वाहक अजय सोनूने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घ...

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम; विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा

  राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम;   विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा बुलढाणा, दि. 28 (जिमाका) :   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागातर्फे सर्व आगारांमधून पर्यटकांसाठी विशेष पॅकेज टुर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या टुर्सचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे. या पॅकेज टुर्स अंतर्गत एक दिवसापासून ते तीन दिवसांपर्यंतच्या देवदर्शन आणि पर्यटनस्थळांच्या भेटीचा समावेश आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकींगद्वारे ही सेवा राबविण्यात येणार असून, सर्व आगारांमधून नियोजित स्थळांकरिता वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. एक दिवसांचे पॅकेज टुर्स : अजिंठा लेणी-वेरुळ घृष्णेश्वर-खुलताबाद-परत, शेगाव-चिखलदरा-परत, पैठण-परत. दोन ते तीन दिवसचे पॅकेज टुर्स: कपीलधार-तुळजापूर-अक्कलकोट-पंढरपूर-परत, आळंदी-देहू-भिमाशंकर-परत, शिर्डी-शनिशिंगणापूर-देवगड-परत, औंढा नागनाथ-परळी वैजनाथ-परत, नाशिक-वणी सप्तशृंगी-त्र्यंबकेश्वर-परत, मुक्ताईनगर-चांगदेव-इच्छापूर-अंमळनेर-परत. याशि...

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

Image
  हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन   – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही बुलढाणा,दि.25(जिमाका) :   जिल्ह्यातील सोयाबीन व मका पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी, या संकटावर मात करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली आहे. प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ३१३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. बाधित क्षेत्रातील पंचनामे जलदगतीने सुरू असून, शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळवून दिली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी २४ जुलै रोजी प्रसारित केलेल्या तांत्रिक बुलेटिननुसार, अळीच्या जीवनचक्रावर आधारित एकात्मिक व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्या...

डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद

  डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन सोमवारी(4 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद बुलढाणा, दि. 25 (जिमाका) :   भारतीय डाक विभाग आपल्या सेवा प्रणालीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘आय.टी. 2.0’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत एपीटी (APT) अप्लिकेशन ही नवीन डिजिटल प्रणाली कार्यान्वित करत आहे. या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे डाक व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार असून, यामुळे पोस्ट ऑफिसमधील सेवा आणखी सक्षम होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाखा टपाल कार्यालये व उपडाकघरांमध्ये ही प्रणाली मंगळवार दि. 5 ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात येत आहे. या संक्रमणासाठी आवश्यक असलेल्या डेटाच्या स्थलांतराची प्रक्रिया सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी पार पडणार असल्याने त्या दिवशी (दि. 4 ऑगस्ट रोजी) बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे महत्त्वाची कामे 4 ऑगस्टपूर्वीच पूर्ण करावीत, जेणेकरून व्यवहारात अडथळा येणार नाही, अशी माहिती अधिक्षक डाकघर, बुलढाणा यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. 0000000

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

  अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले बुलढाणा,दि.25(जिमाका) : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी सन 2025-26 शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाने मंजूरी दिली आहे. सन 2025-26 वर्षासाठी जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दि. 18 जुलै 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 1 ऑगस्ट 2025 पर्यंत https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन भरुन त्याची प्रिंट पोस्टाने किंवा समक्ष आयुक्त, समाज कल्याण, 3, चर्च पथ, पुणे 411001 येथे सादर करावी, असे अवाहन पुणे समाज कल्याण विभागाचे आयुक्तांनी केले आहे. योजनेच्या अटी व शर्ती: विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन   बुलढाणा, दि. 25 (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 व्या हप्त्याचा लाभ लवकरच वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 99 शेतकऱ्यांची ई केवायसी आणि 4 हजार 433 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ई केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याला डिबीटी इनेबल करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डिबीटी इनेबल करण्याचे आवाहन कृषि उपसंचालक अनुराधा गांवडे यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे, नसल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ...

सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

  सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा बुलढाणा,दि.25(जिमाका) :  राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील हे शुक्रवार व शनिवार दि. 25 व 26 जुलै 2025 रोजी शेगाव व खामगाव जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार दि. 25 जुलै रोजी रात्री 9.15 आनंद विसावा, शेगाव जि.बुलढाणा येथे आगमन व राखीव. शनिवार दि.26 जुलै 2025 रोजी सकाळी 7 वाजता श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन. सकाळी 7.30 वाजता आनंद विहार येथे कार्यकर्त्यांशी भेट. सकाळी 9.30 वाजता खामगावकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता ब्रिटिश कालीन विश्रामगृह, खामगाव येथे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक.  सकाळी 11.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन. सकाळी 11.45 वाजता शहर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन. दुपारी 12 वाजता टॉवर चौक येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन, दुपारी 12.15 वाजता सानंदा निकेतन येथे सदिच्छा भेट व राखीव. दुपारी 1.15 वाजता एकबोटे चौक, अग्रसेन चौक येथे राष्...