Tuesday 10 October 2023

DIO BULDANA NEWS 10.10.2023

 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा दौरा

बुलडाणा, दि. 10 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दि. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या जनसुनावणीस उपस्थित राहतील.

दौऱ्यानुसार श्रीमती चाकणकर यांचे गुरूवार, दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होऊन मुक्काम करतील. शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक घेईल. तसेच सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. शनिवार, दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळाला भेट देतील.

00000

शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर आणि सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्यासाठी इच्छुकांनी सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, जतकर कॉम्प्लेक्स, पाटबंधारे ऑफिससमोर, संगम चौक बुलढाणा येथे उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसूचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे नामांकीत कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करण्यात येणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा मॉडेल करीयर सेंटरच्या rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांना प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही.

इच्छुक उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करु शकतो. उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधीसमवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07262 - 242342 तसेच कार्यालयातील योगेश लांडकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7447473585 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

00000

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये भरती

बुलडाणा, दि. 10 : मराठवाडा पर्यावरण बटालियन, 138 इन्फ्रेंटी टीए इको, महार  एमओईएफ आणि सीसी आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांच्या अकाली निवृतीसह भरती करण्यात येणार आहे.

भरतीसाठी सोल्जर जीडी 87 जागा, लिपिक 6, शेफ कम्युनिटी 1, हाऊस किपर 1, ब्लॅकस्मिथ 1, मेस किपर 1, आर्टीसन 1 अशा एकूण 98 जागांची भरती करण्यात येणार आहे. 136 इन्फ्रेंट्री बटालियन टीए इको, महारमध्ये भरती पात्रता पुढील प्रमाणे असणार आहे. माजी सैनिकांसाठी किमान वय नाही. मात्र सेवानिवृती, डिस्चार्ज झाल्यापासून पाच वर्षाच्या आत पाहिजे. एमओईएफ आणि सीसी आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी अकाली सेवानिवृत्तांसह किमान वयोमर्यादा नाही. तथापि सेवानिवृत्ती, डिस्चार्ज झाल्यापासून पाच वर्षांच्या आत पाहिजे. माजी सैनिक 50 वर्षे वयापर्यंत सेवा देऊ शकतील.

136 इन्फैंट्री बटालियन टीए इको, महार येथे दि. 17 ऑक्टोबर 2023 ते दि. 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत कोल्हापूर येथे 109 इटालियन (टीए) मराठा लाईट इन्फ्रेंट्री येथे माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा होणार आहे. एमओईएफ आणि सीसी आणि राज्य वन विभागाचे सेवानिवृत्त, 136 इन्फ्रेंट्री बटालियन टीए महारमध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवा करणारे सर्व पात्र उमेदवार दिलेल्या वेळापत्रकानुसार 17 ऑक्टोबर 2023 रोजी 5 वाजता कोल्हापूर येथील 109 इन्फ्रेंट्री बटालियन टीए मराठा लाईट इन्फ्रेंट्रीच्या युनिट स्थानावर भरतीसाठी 6 वाजता शारीरिक फिटनेस चाचणीसह सुरु होईल. इच्छुक उमेदवारांनी भरती सुरू होण्याच्या किमान एक तास आधी सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे.

वैद्यकीय श्रेणी आकार - 1, वर्ण – अनुकरणीय, खूप छान, पात्रता, क्यूआर ही माजी सैनिक केवळ पेन्शनधारक आणि माजी महिला एमओईएफ आणि सीसी आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाचे कर्मचारी अकाली सेवानिवृत्तांसह एमओईएफ आणि सीसी आणि महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये किमान 20 वर्षे सेवा असलेले, तसेच त्यांनी सेवानिवृती, डिस्चार्जच्या तारखेपासून पाच वर्षाच्या आत पाहिजे.

ऊंची 160 सेंमी गोरखा, गढवाली आणि आसामच्या बाबतीत 152 सेंमी, एमओईएफ आणि सीसी आणि राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी 150 सेंमी, वजन माजी सैनिकांसाठी किमान ५० किलो, माजी महिलांसाठी किमान 42 मिली, छाती माजी सैनिकांसाठी 82 सेमी किमान विस्तार 5 सेमी, स्त्रिया 05 सेमी छातीचा विस्तार करण्यास सक्षम असावीत. शारीरिक तंदुरुस्ती चाचणी केवळ पुरुषांसाठी 1.6 किमी धावणे ही निर्दिष्ट वेळेत कव्हर करण्यास सक्षम, ८ ते ९ फूट खंदक वयानुसार उडी मारून पार करण्यास सक्षम असावे. पुलअप्स स्वतःला पातकीपर्यंत खेचण्यास सक्षम असावे. झिगझॅग शिल्लक उंच प्लॅटफॉर्मवर चालण्यास सक्षम असावे.

000000

10 वर्षावरील अवसायनातील दुग्ध सहकारी संस्थाची नोंदणी रद्द

*जिल्ह्यात 10 वर्षावरील 223 संस्था अवसायनात

*टप्प्याने कारवाई करून नोंदणी रद्द करण्यात येणार

बुलडाणा, दि. 10 : राज्य शासनाच्या निर्णयानुसार 10 वर्षांवरील अवसायनातील दुग्ध सहाकरी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 10 वर्षांवरील 223 संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. या संस्थांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करून नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे व विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 109 अंतर्गत तरतुदीनुसार अवसायनातील सहाकरी संस्थाची नोंदणी रद्द करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. अवसायनातील संस्थाची नोंदणी रद्द करण्यापूर्वी संस्थाच्या हरकती, आक्षेप मागविणे आवश्यक आहे. संबंधित संस्था आणि त्यांच्या धनको, ऋणको आणि अन्य संबंधितांचे म्हणणे एकूण घेण्याकरीता प्रसिद्धी करण्यात आले आहे.

 अवसायनातील संस्थाची यादी प्रमाणे एकूण २२३ संस्थाची नोंदणी रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. नोंदणी रद्द करण्यापूर्वी अवसायक, कार्यालयास त्यांच्या हरकती, आक्षेप सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) बुलडाणा, प्रशासकीय इमारत, बुलडाणा यांच्याकडे प्रसिध्दी दिनांकापासून सात दिवसाच्या आत नोंदविण्यात यावे. उक्त कालावधीत कोणतेही आक्षेप व हरकती प्राप्त न झाल्यास कोणास काहीही म्हणावयाचे नाही असे गृहीत धरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 109 अंतर्गत तसेच कलम 21 अतर्गत नोंदणी रद्द करणेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे, असे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) बुलडाणा यांनी कळविले आहे.

अवसायनातील संस्थांची यादी पुढीलप्रमाणे आहे. बुलडाणा तालुका (दुग्ध संस्था) - सर्वादेय –रायपूर, शारदा –वरवंड, शंकर - दहीद बु., गजानन - साखळी बु., गणेश - नांद्रा कोळी, गजानन – पिंपळगांव सराई, अजिंठा - साखळी खुर्द, जगदंबा – ढासळवाडी, अमर – देऊळघाट, गजानन तराळखेड, प्रगती – तांदुळवाडी, लक्ष्मी - ढालसावंगी, स्व. भा. शिंगणे - कुलमखेड, बुधनेश्वर – मढ, कामधेनू – कुंबेफळ, श्रीनाथ - गिरडा बु., कृष्णा बोधेगांव, भगीरथ देवपूर, जय गजानन – मोंढाळा, गणेश - भादोला, गजानन – माळविहीर, चक्रधर - रुईखेड टेकाडे, श्रीकृष्ण - शिरपूर, जगदंबा - धाड, सागवन - सागवन,

लोणार तालुका - सदगुरु हिवरावखंड, गोपालकृष्ण – देऊळगांव कुंड, यशोदामाता – महार चिकणा, भोलेनाथ – वढव,  अंबिका - पांगरा डोळे, शाहूदेव – खुरमपुर,  राधाकृष्ण - कोयाळी, राजीव गांधी –किन्ही, कामधेनु - हात्ता, गजानन शिवणी पिसा, श्रीकृष्ण - तांबोळा, संत नेमीनाथ - सोमठाणा,

चिखली तालुका – जयभवानी - गोद्री, सावरगांव –डु-सा. डुकरे, सोमनाथ – डोंगरशेवली, दत्तकृपा - दिवठाणा, किसनदेव - एकलारा, शिवशक्ती महिमळ, कामधेनु धोत्रा भनगोजी, सोनाजी – उतरादा, जयभवानी – इसोली, संगम – मुंगसरी, हनुमान –मालगणी, गोपाल - वळती, संतोषीमाता - सवणा, लक्ष्मी - अंत्री कोळी, अन्नपूर्णा – खोर, दत्तकृपा –शेलूद, क्रांती – पांढरदेव, जिवनज्योती - अमडापूर, देऊळगाव राजा तालुका - मेहरबाबा – किन्ही पवार, कामधेनु – इसरुळ, जय भोले – मंगरुळ, हनुमान – येवता, गणेश - देऊळगांव धनगर, म. ज्यो. फुले - अंभोरा, अन्नपूर्णा - मेरा बु,, जय मल्हार -आळंद, गजानन – चांदई, गुरु परमानंद - काटोडा, सिद्धेश्वर – कोलारा, शिवकृपा चिंचोली बुरुकुल, सरस्वती - अंत्री खेडेकर, विठ्ठल - पाडळी शिंदे, कामधेनु - शेलगांव अटोळ, शिवशंकर – भरोसा, संजीवनी - गांगलगांव, शिवकृपा - मंडपगांव, म. जो. फुले – डोढ्रा, ब्रम्हानंद - सिनगांव जहा. स्वा. भा. शि. - दे. महि, मिलींद- जांभोरा.

मेहकर तालुका - पांडुरंग – आंद्रुड, व. नाईक — गोहगांव, समता - हिवरा खुर्द, पैनगंगा – कंबरर्खेड, कामधेनु - फैजलापूर, शिवशंकर - परडा, जगदंबा – शेंदला, माऊली कल्याणा, पैनगंगा – परतापूर, गजानन – ब्रम्हपुरी, प्रेरणा – दूधा, मातासती - नागझरी खुर्द, अंजनी बु - अंजनी बु,, अंबिका - वडगांव माळी, शिवगंगा – वरवंड, जिजामाता -चिचोली बोरे, जय महाराष्ट्र महिला – खंडाळा.

सिदखेडराजा तालुका - पूर्णा – दुसरबीड, पारसनाथ- वाघाळा, कपिला — राहेरी, मंगलादेवी – नसिराबाद, भुलेश्वर - शेंदुर्जन, कामधेनु - खामगांव, आनंद – पिंपळगांव कुडा, हनुमान – वाघोरा, नरसिंह - उमरद, गजानन – पांगरखेड,  म. ज्यो. फुले – जांभोरा, म. ज्यो. फुले – आडगाव राजा, हनुमान – शेलगाव राऊत, शंकर – निमखेड, बालाजी – खैरव, गजानन – देऊळगाव कोळ, सयाजी – सोनोशी, कान्होबा – कुंबेफळ, कै. भा. शिंगणे तडेगाव, सोमनपुरी बाबा - वरदडी, धौम्य ऋषी - रताळी, भगवानबाबा -जऊळका, गजानन – सावखेड तेजन.

मलकापूर तालुका – उमाळी - उमाळी, तालसवाडा - तालसवाडा, गोकुळ -  तांदुळवाडी, जय मल्हार - मलकापूर, दुधलगाव – दुधलगाव.

मोताळा तालुका -  माकोडी – माकोडी, अंबिका तळणी, मथुरा - माळेगांव वडजी, पिंप्री गवळी - पिप्री गवळी, शारदा चिंचपूर, गोपाल - पान्हेरा खेडी, माधव – कोथळी, बजरंगबली – कोराळा, खंडोबा - रिधोरा खं, कपिला – धामणगांव बढे, सा. मारोती झ्सारोळा मारोती, स्व. वामनराव पा - पोखरी, शिवशक्ती – पोफळी, कैलास – चावर्दा, गोकुळ - शेलापूर खुर्द, योगिता - सावरगाव जहा, भक्ती – सारोळा पिर, शेलापूर खुर्द —शेलापूरखुर्द, श्रीकृष्ण –तरोडा, समर्थ – माकोडी, गजानन – आव्हा, श्रीकृष्ण – आव्हा, गजानन – मोताळा, ज्ञानेश्वर – काबरखेड, सचिन – तिघ्रा, जय अंबे – वरुड, जगदंबा – जयपूर, कामधेनु घुसर, विजय सांगळद, बिरसिंग नाईक - कुऱ्हा गोतमारा, गंगा – बोराखेडी, गोकुळ – किन्होळा, नारायण – राजूर, नळगंगा- भोरटेक, मंगलागौरा - डिडोळा,

नांदुरा तालुका – तिकोडी — तिकोडी, जनता - शेलगांव मुकुंद, गुरुदेव – पोटळी, समता – दहीगांव, येरळी – येरळी, अंबिका - धानोरा बु., कपिला - धानोरा विटाळी, केदारनाथ – दहीवडी, विश्वेश्वर - तांदुळवाडी, विदर्भ – नांदुरा,

खामगांव तालुका - खामगांव तालुका दूध उत्पादक सहकारी संस्थांचा संघ मर्या. खामगाव, गवंढळा – गवंढळा, लाखनवाडा - लाखनवाडा, गजानन – राहूड, लोखंडा – लोखंडा, पिंप्री कोरडे पिप्री कोरडे, अंबिका - पिंपळगाव राजा, चिंचपूर – चिंचपूर, पळशी बु., - पळशी बु,, वीर हनुमान – बोरजवळा,  म. ज्यो. फुले – भंडारी, गोपालकृष्ण - नागझरी खुर्द, जय हरी - भालेगांव बाजार, गणेश – अंत्रज, श्री संत श्री चंद — जयरामगड, गुप्तेश्वर शिला नेमाने, यशवंत - आडगांव बोरी, गारडगांव – गारडगांव, जगदंबा - पिंप्री धनगर, जयदुर्गा - माटरगांव गेरु, न्यू भारत – गोंधनापूर, ज्योतिबा फुले – कंझारा, यशोदा - पातोंडा पेंडका, आदर्श – माथणी.

संग्रामपूर तालुका – दूधगंगा - मनाली, संजिवनी - पळशी झाशी, लिंगेश्वर – भोन, डॉ. पंजाबराव – निपाणा, शेगाव तालुका - कामधेनु – शेगाव, पूर्णा – मनसगाव, माटरगाव – माटरगाव, मुरलीधर – पिप्राळा, कनारखेड – कनारखेड, शिवभक्त – आडसुळ, संतकृपा - नागझरी खुर्द, आदर्श तरोडा कसबा, पहुरजिरा - पहुरजिरा, गजानन - सवर्णा, बजरंग - आमसरी, किसान - माटरगाव बु,, श्रीकृष्ण - अंभोडा, पांडुरंग - पहूरपूर्णा, शेतकरी - सगोडा, श्रीकृष्ण - सावंगा, शिवशक्ती - वरखेड खुर्द, श्रीकृष्ण - जवळा पळसखेड,

जळगाव जामोद तालुका - जनता – आसलगाव, गोमाता – खंडवी, कामधेनु - जळगाव जा., श्री जगदंबा – सुपडा, महानंद महिला – जळगाव, श्री सुपो - पळशी सुपो, जयश्री – पळसखेड, भैरवनाथ – वडगांवगड, आदिवासी चालठाणा, सातपुडा आदिवासी हनवतखेड.

0000000


No comments:

Post a Comment