Monday 23 October 2023

नैसर्गिक आपत्तीचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार: शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना जाहिर

 नैसर्गिक आपत्तीचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार: शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना जाहिर


बुलडाणा दि. 21 जिमाका : जिल्हयातील नैसर्गीक आपत्ती अनुदान वाटप ऑनलाईन डिबीटीव्दारे लाभार्थ्यांच्या आधार लिंक  खात्यात थेट अनुदान जमा होणार आहे. परंतु काही लाभार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तहसिल कार्यालयामार्फत उपाययोजना राबविण्यात येत  आहेत. या उपाययोजनाचा शेतकऱ्यांनी अंमलबजावणी केल्यास नैसर्गिक आपत्तीचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती तहसिलदार  निलेश मडके यांनी कळविले आहे. 


उपाययोजना याप्रमाणे : 1. खातेदारांना विशिष्ट क्रमांक मिळाल्यानंतर त्यांनी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा घेऊन आधार प्रमाणीकर करुन घ्यावे.

2. आधार प्रमाणीकरण होत नसल्याची तक्रार आल्यास संबंधीत लाभार्थी खातेदारांनी महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावरुन मिळालेली पोच सोबत आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स तलाठी कार्यालय किंवा तहसिल कार्यालयात सादर करावी. सदरची तक्रार पंचनामा पोर्टलवरील ग्रिवन्स टॅबवरुन निकाली काढल्याशिवाय खातेदारांच्या खात्यात अनुदान जमा होणार नाही. 

3. ज्या लाभार्थी खातेदारांच्या बोटाचे ठसे उमटत नसल्यास त्यानी ई-केवायसी नॉट पॉसिबल ही ग्रिवन्स टाइप निवडावी.

4. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मयत व्यक्तीच्या नावाने विशिष्ट क्रमांक आल्यानंतर एका वारसाच्या नावाने पैसे काढण्यासाठी इतर वारसाची हरकत नसल्याचे संमतीपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक घेऊन महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन Grievances Type 6 (“Unable to Authenticate Disagree  Aadhar”) ही Grievances Type निवडल्यानंतर तक्रार तहसिलदार लॉगीनमधिल तक्रार पोर्टलवर दिसेल. त्यांनतर सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर तक्रार निकाली काढण्यात येईल. तसेच वारसाने पुन्हा  महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन त्यास विशिष्ट क्रमांकाला आधार प्रमाणीकरण करण्यात यावे. 

5. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर सुध्दा काही लाभार्थी खातेदारांचे Aadhar mapping does not exist/Aadhaar number not mapped to IN, Inactive Aadhaar, Invalid Bank Identifier या कारणामुळे पेमेन्ट रिजेक्ट झाल्याचे दिसुन येते.

6. Inactive Aadhaar म्हणजे लाभार्थी खातेदारांचे आधारला दहा वर्ष झाले असून त्यांनी त्या आधारमध्ये कोणतेही अपडेट केलेले नाही तर सर्वप्रथम त्यांनी आपले जवळच्या आधार केंद्रातून आधार Biometric अपडेट करावे. त्यांनतर बँकेत जाऊन आधार लिंक Bank seeding NPCI करुन घ्यावे. असे केल्यावर शासनस्तरावरुन पैसे आपोआप  आधार लिंक खात्यात जमा होईल. 

7.  आधार अपडेट केल्यानंतर काही दिवसानी बँकेत जाऊन आधार लिंक Bank seeding करणे आवश्यक राहिल.  

8. लाभार्थी खातेदार यांना नैसर्गीक आपत्ती अनुदान 2021 व 2022 बाबत काही अडचणी आल्यास त्यांनी आपल्या गावच्या तलाठी यांचेकडे चौकशी किंवा तक्रार सादर करावी. 

9. सामाईक खातेदार किंवा बाहेर गावी राहणारे खातेदार यांनी अद्याप तलाठी कार्यालयात  बँक तपशिल,  आधार कार्ड व  संमतीलेख (सामाईक खातेदार यांच्याकरिता) सादर केलेला नसल्यास त्यांनी तात्काळ तलाठी यांचेकडे सादर करावे. जेणेकरुन लाभार्थी खातेदार अनुदानापासुन वंचित राहणार नाही. 


शेतकऱ्यांना  प्रत्यक्ष मदत करण्यासाठी तहसिल कार्यालय येथे मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. सोबतच शेतकरी, दिव्यांग व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरीक यांचेसाठी दर बुधवारी दुपारी 12 ते 4  ह्या वेळेत तहसिल कार्यालय मेहकर येथे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.  शिबिरामध्ये शेतकऱ्यांचे अडचणी सोडवण्यासोबतच इतर विभागाच्या विशेषत: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, सेतु विभाग, आरोग्य विभाग इ. योजनाचाही लाभ दिल्या जाणार आहे. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार यांनी केले

00000

No comments:

Post a Comment