DIO BULDANA NEWS 30.6.2022
पंढरपूर यात्रेसाठी एसटी सज्ज; 210 बसेस धावणार बुलडाणा, (जिमाका) दि.30 : आषाढी पंढरपूर यात्रा 6 जुलै ते 16 जुलै पर्यंत पंढरपूर जि. सोलापूर येथे असणार आहे. यात्रोचा मुख्य दिवस आषाढी शुद्ध एकादशी 10 जुलै 2022 रविवार राहणार आहे. तसेच बुधवार, 13 जुलै 2022 रोजी पौर्णिमा आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. पंढरपूर करीता जिल्ह्याच्या विविध आगारांमधून प्रवाशांसाच्या सोयीसाठी 210 बसेस धावणार आहे. कोणत्याही गावामध्ये कमीत कमी 50 प्रवाशी थेट मिळत असल्यास त्या प्रवाशांकडून प्रवास भाड्याची पूर्ण रक्कम आगाऊ भरणा करून त्या गावातून भाविकांना पंढरपूरकरीता थेट बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षित सेवेसाठी एसटी महामंडळ सर्व आगारातून खास पंढरपूर यात्रेकरीता जादा बसेस सोडण्याची व्यवस्थाही करीत आहे. तरी प्रवाशांनी पंढरपूर यात्रेसाठी अवैध, खाजगी वाहनातून जीव धोक्यात घालून प्रवास न करता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनेच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार व विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी केले आहे. यात्रेकरीता आगा...