Posts

Showing posts from May, 2021

DIO BULDANA NEWS 31.5.2021

Image
प्रतिकूल परिस्थितीतही रेशीम शेतीतून आणली समृद्धी • कल्याणा ता. मेहकर येथील 11 शेतकऱ्यांनी मिळून केली रेशीम शेती बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : सगळीकडे कोरोनाची दहशत असताना शेतकरी राजा मात्र काळ्या मातीत राब राब राबत होता. कृषी क्षेत्र गतीमान ठेवून अर्थचक्र फिरवित होता. यामध्ये जिल्ह्यातील शेतकरीही मागे नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून समृद्धी आणण्याचा प्रयत्न बळीराजाचा सुरूच होता. जिल्ह्यातही याचे उदाहरणे समोर आली. मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील 11 शेतकऱ्यांनी एकत्र येत रेशीम शेती केली. त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतून रेशीम शेतीतून समृद्धी आणली आहे. रेशीम शेती मधील किटक संगोपनाची कामे साधारणतः उन्हाळ्यात बंद असतात. परंतु या वर्षी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा कल्याणा ता. मेहकर येथील 11 शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत रेशीम कीटक संगोपन घेतले. तसेच यशस्वीपणे पुर्ण केले. अंदाजे 650 ते 700 किलो ग्रॅम कोष उत्पादन त्यांना होणार आहे. सध्या रु.280 ते 310 प्रति किलोग्रॅम भाव कोषबाजारात आहे. या उत्पादनातून सदर शेतकऱ्यांना अंदाजे रु 1.5 ते 2 लक्ष रूपयांचे उत्पन्न निश्चितच मिळणार आहे. अवघ्या 1...

DIO BULDANA NEWS 27..2021

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन • उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डच्या लॉग ईन आयडीतून अर्ज करावे • 30 मेपर्यंत चालणार मेळावे बुलडाणा,(जिमाका)दि.27 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 27 ते 30 मे 2021 पर्यंत चालणार आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www. mahaswayam.gov.in व www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भरावे. या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभा...

DIO BULDANA NEWS 25.5.2021

खत विक्रेत्यांनी जुन्याच दरांनी खत विक्री करावी कृषी विभागाचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. माहे एप्रिल 2021 पासून युरीया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती. केंद्र शासनाने 20 मे 2021 च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किंमतीसाठी अनुदान देण्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्याच दराने विक्री करावयाची आहे. तरी काही खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापील किंमतीवर खते विक्री करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. ज्या खत विक्रेत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यांनी सुधारीत दराप्रमाणेच खते विक्री करावी. शेतकऱ्यांनी सुद्धा सुधारीत दरांप्रमाणेच खते खरेदी करावी. सुधारीत दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी किंवा जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा कक्षातील अरूण इंगळे यां...

DIO BULDANA NEWS 23.5.2021

Image
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी सज्ज राहावे - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे * कथित आरोपांनी डॉक्टरांनी निराश होऊ नये * रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील संयम पाळत डॉक्टरांचा सन्मान करावा बुलडाणा, (जिमाका) दि. २३ - चिखली शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर झालेल्या कथित आरोपांनी डॉक्टरांनी निराश होऊन न जाता संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची देशात दुसरी लाट सुरू असून तज्ज्ञांच्या माहितीनुसार लवकरच तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चिखली शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांची महत्वपूर्ण बैठक स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासगी हॉस्पिटलला व डॉक्टरांना येणाऱ्या अडीअडचणी पालकमंत्री महोदयांनी जाणून घेतल्या. डॉक्टरांवर व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर...

DIO BULDANA NEWS 22.5.2021

Image
मोबाईल मेडीकल युनीट वाहनाची पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली पाहणी मोबाईल युनीट वाहन जनतेच्या आरोग्य सेवेत रूजु लोणार, खामगांव व मेहकर तालुक्यातील दुर्गम भागात जावून देणार सेवा बुलडाणा,(जिमाका) दि.22 : राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये मोबाईल मेडीकल युनीट प्रकल्पासाठी दुर्गम आणि अतिदुर्गम भागांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातही मोबाईल मेडीकल युनीट वाहन मंजूर झाले असून हे वाहन मेहकर, लोणार व खामगांव तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये वैद्यकीय सेवा देणार आहे. या वाहनाची आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी वाहनांमधील वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. तसेच सुविधांविषयी माहिती घेतली. या मेडीकल युनीटचा जिल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांच्या वैद्...

DIO BULDANA NEWS 21.5.21

Image
लहान मुलांवरील कोविड उपचारांसाठी बाल रोग तपासणी कक्ष तयार ठेवावे - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक म्युकर मायकोसिसवरील उपचारासाठी सामान्य रूग्णालयात विशेष शस्त्रक्रीया कक्षाची व्यवस्था बुलडाणा,(जिमाका) दि.21 : देशात पुढील सहा ते सात महिन्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेमध्ये लहान मुले प्रादुर्भावग्रस्त होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने लाटेपासूल लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी आतापासून तयारीला लागावे. त्यासाठी जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये विशेष बाल रोग तपासणी कक्ष तयार करण्यात यावे, तसेच बेडची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोविडबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अ...

DIO BULDANA NEWS 20.5.2021

कोरोना अलर्ट : प्राप्त 4946 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 591 पॉझिटिव्ह • 759 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5537 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4946 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 591 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 367 व रॅपीड टेस्टमधील 224 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 952 तर रॅपिड टेस्टमधील 3994 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4946 अहवाल निगेटीव्ह आहेत. तालुका निहाय पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 63, बुलडाणा तालुका : साखळी बु 1, साखळी खु 1, सुंदरखेड 1, पिं. सराई 2, चांडोळ 2, करडी 2, देवपूर 1, वरूड 1, धाड 4, शिरपूर 1, डोंगर खंडाळा 1, हतेडी 2, केसापूर 1, सागवन 1, खुपगांव 1, इजलापूर 1, कुलमखेड 1, पाडळी 1, वरवंड 1, रायपूर 1, मोताळा तालुका : लिहा 1, पिं देवी 2, दाभाडी 1, घुसर 1, उबाळखेड 5, चावर्दा 1, खामगांव शहर :21 , खामगांव तालुका : भालेगांव 1, पारखेड 2, वर्...

DIO BULDANA NEWS 19.5.2021

जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह निर्बंध लागू किराणा, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी 7 ते 11 खुली राहणार कृषी निगडीत सेवा, दुकाने व पावसाळी हंगाम साहित्य दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत, सर्व बँक, वित्तीय संस्था सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : राज्य शासनाने कोविड च्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन आदेश लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही 20 मे 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 1 जुन रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंधासह प्रतिबंधात्मक जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आदेश परित केले आहे. जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह हे निर्बंध लागू राहणार आहेत. या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन,मटन,पॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने, स्वीट मार्ट), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस पंप सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी, बेकरी,...

DIO BULDANA NEWS 18.5.2021,1

Image
कोविड नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून चाचण्यांचे प्रमाण वाढवा - विभागीय आयुक्त पियुष सिंग बुलडाणा,(जिमाका) दि. 18 : कोविड या साथरोगाची दुसरी लाट आपल्या शिखरावर आहे. विभागातील जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोविड रूग्णसंख्या वाढून मृत्यू देखील वाढले आहेत. तरी यंत्रणेने बाधीत रूग्णाच्या निकट व बाह्य संपर्कातील व्यक्ती ट्रेस करून कोरोना चाचणी करावी. कोविड नियंत्रणासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर मीना, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी श्री. गोगटे, निवासी उप जिल्हाधिकारी दिनेश गीते आदी उपस्थित होते. ...

DIO BULDANA NEWS 17.5.2021

महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत 996 उपचारांचा लाभ गंभीर अवस्थेतील कोरोना बाधीत रूग्णांवर 20 पॅकेजखाली उपचार 6 खाजगी रूग्णालयांना कोविड उपचारासाठी मान्यता बुलडाणा,(जिमाका) दि.17 : महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य या एकत्रित योजनांतंर्गत राज्यात 996 उपचारांचा लाभ सर्व नागरिकांना देण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत उपचारासाठी केवळ शिधापत्रिका किंवा तहसीलदारांचा दाखला किंवा शासन मान्य छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. कोविड 19 साथरोगाच्या गंभीर अवस्थेतील रूग्णांना या योजनांमध्ये उपचाराचा लाभ मिळतो. अशा गंभीर रूग्णांना व्हेंटिलेटरसह व व्हेंटीलेटरविना देण्यात येणाऱ्या 20 पॅकेजखाली उपचार मिळत आहे. कोविडवरील उपचारादरम्यान पॅकेजचा कालावधी संपला व उपचार पूर्ण झाला नसल्यास रूग्णाच्या कुंटूबाचे 1.50 लक्ष रूपये संपेपर्यंत उपचाराचा कालावधी लांबविता येतो. जर कुंटूंबातील सर्व सदस्य रूग्णालयात दाखल असतील व लॉकडाऊन सुरू असल्यास कागदपत्रे सादर करता न आल्यामुळे उपचार थांबणार नाही. अशा परिस्थितीत फोन करूनही उपचार सुरू करता येतो. लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत लाभार्थी कागदपत्रे...

DIO BULDANA NEWS 15.5.2021,2

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना 716 रेमडेसिवीरचे वितरण बुलडाणा, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 15 मे रोजी 716 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली. आज 15 मे रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 7 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 20, रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 8, निकम हॉस्पीटल 7, जाधव पल्स हॉस्पीटल 12, सहयोग हॉस्पीटल 11, आशिर्वाद हॉस्पीटल 24, सिद्धीविनायक हॉस्पीटल 14, काटकर हॉस्पीटल 0, शिवसाई हॉस्पीटल 11, संचेती हॉस्पीटल 2, सिटी हॉस्पीटल 0, सोळंकी हॉस्पीटल 0, खरात हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 0, सुश्रुत हॉस्पिटल 5, बुलडाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 13 , रेड्डी हॉस्पीटल 6 , कोठारी हॉस्पीटल 0, न्यू लाईफ कोविड हॉस्पीटल 8, चिखली : योगीराज हॉस्पीटल 22, हेडगेवार हॉस्पीटल 10, गुरूकृपा हॉस्पीटल 19, तायडे हॉस्पीटल 27, दळवी हॉस्पीटल 21, पानगोळे हॉस्पीटल 22, खंडागळे हॉस्पीटल 24, ...

DIO BULDANA NEWS 15.5.2021

Image
प्राणवायू निर्मितीमध्ये जिल्ह्याला स्वंयपूर्ण करणार -पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  *कोविड समर्पित रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वित बुलडाणा, (जिमाका) दि. 15 :  कोरोनाने थैमान घातले असताना सक्रिय रुग्णांना प्राणवायू ची वाढती गरज भासू लागली. अशा परिस्थितीत अन्य जिल्ह्यांमधून प्राणवायू चा पुरवठा जिल्ह्याला होत होता. मात्र अनेकवेळा गरजेपेक्षा कमी प्राणवायू मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातच प्राणवायू निर्मिती करून जिल्ह्याचे याबाबत अन्य जिल्ह्यावरील परावलंबत्व संपुष्टात आणणे गरजेचे आहे. पुढील काळात जिल्ह्याला प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण करणार येऊन जिल्हा याबाबत स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज व्यक्त केला. जिल्हयात प्राणवायू तुटवड्यावर निदान म्हणून प्राणवायू निर्मिती प्रकल्प पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत. आज १५ मे रोजी येथील स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पलकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांच्या हस्ते हवेतून प्राणवायू ...

DIO BULDANA NEWS 12.5.2021,2

Image
  प्राणवायु निर्मिती प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करावे -           जिल्हाधिकारी एस रामामूर्ती बुलडाणा, (जिमाका) दि.12 :  सक्रीय रूग्णांची लक्षात घेता प्राणवायूची गरज भविष्यातही अशाच पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे स्थानिक सामान्य रूग्णालयात प्राणवायू निर्मिती  प्रकल्प असणे गरजेचे आहे. तरी या प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करून रूग्णांच्या सेवेत रूजू करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केल्या आहे.     जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी आज खामगांव सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीत आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी  रूग्णालयातील कोविड वार्ड, डायलेसीस विभाग, पाकगृह, कोविड प्रयोगशाळा व नव्याने प्रस्तावित प्राणवायू प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी वैदयकीय अधीक्षक यांचे दालनात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसीलदार सुरेखा जगताप, न.प.मुख्याधिकारी श्री. आकोटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे, गटविकास ...

DIO BULDANA NEWS 12.5.2021

  अत्यावश्यक सेवांमध्ये सवलतीसह कडक निर्बंध लागू बुलडाणा, (जिमाका) दि 12 :  कोविड -19 च्या अनुषंगाने दिनांक 10 मे 2021  ते दिनांक 20 मे 2021 पर्यंत कडक निर्बंधाबाबत आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेशामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये सवलती देवून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.    पेट्रोलपंप :  ग्रामीण तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपावरुन केवळ शेतक-यांना त्यांच्या शेतातील मशागतीची (नांगरणी, वखरणी, गाळ टाकणे व इत्यादी) कामे तसेच मालाची वाहतुक करण्याकरिता ट्रॅक्ट्रर्सना डिझेल इंधन पुरवठा करता येईल. कोर्टाची कार्यालयीन कामे सुरु असल्याने वकीलांना पेट्रोल/डिझेल देण्यात यावे.  बँकिंग :  रुग्णालये, गॅस वितरण सेवा, ऑक्सीजन पुरवठा, औषधी दुकाने, यांचेकडे तसेच पेट्रोल पंपावरील जमा होणारी रक्कम बँकेत जमा करणे या करिता संबंधित कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याकरिता दिनांक 10 मे ते दिनांक 20 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यानचा वेळ देण्यात येत आहे.    अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचारी :   दुरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता) विदय...