Posts

Showing posts from August, 2017

NEWS 31.8.2017 DIO BULDANA

अल्पसंख्याक बहुल शासनमान्य शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना जाहीर ·         18 सप्टेंबर 2017 पर्यंत अर्ज सादर करावे बुलडाणा , दि. 31 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ  महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. या अनुदान योजनेतंर्गत कमाल 2 रूपये लाख अनुदान उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल खाजगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ  महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळा व न.प शाळा यांनी शासननिर्णयामध्ये नमूद कागदपत्रांची पुर्तता करून परिपूर्ण अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 18 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावे.    योजनेच्या लाभासाठी शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,  औद्योगिक प्रशिक्षण संस्था व न.प शाळांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी) मिळून किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असावे. तसेच शासन मान्यताप्राप्त अ...

24.8.2017 dpdc meeting news dio buldna

Image
विहीत कालमर्यादेत निधी खर्च करून कामे पूर्ण करावी - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर ·                     कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी महसूल मंडळ स्तरावर शिबिरे ·                     आदिवासी विकास विभागाचे कार्यालय जिल्ह्यात होण्यासाठी शासनास प्रस्ताव ·                     कर्जमाफीकरीता नावावर शेती असलेल्या व्यक्तींचेच आधार कार्ड आवश्यक बुलडाणा दि‍ .24 -  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणारा निधी प्रशासकीय यंत्रणांनी विहीत कालमर्यादेत खर्च करावा. कुठल्याही विभागाने निधी अखर्चीत ठेवून समर्पित करू नये. निधी खर्च करण्याचे व्यवस्थित नियोजन करून कामे पूर्ण करावी. तसेच सन 2016-17 मधील निधी खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र संबंधीत यंत्रणांनी सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री पांडुरंग फुंडक...

news 23.8.2017 dio buldana

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन   बुलडाणा, दि. 23 : हॉकीचे जादुगर म्हणून ओळखल्या जाणारे स्व. मेजर ध्यानचंद यांचे जन्मदिनानिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये सर्वत्र “ राष्ट्रीय क्रीडा दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 8.30 वाजता करण्यात आले आहे.   यावेळी शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.          राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्व. मेजर ध्यानचंद यांचे जिवनावर व्याख्यान, राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.   जे खेळाडू शालेय/संबंधीत अधिकृत फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी असतील त्यांनी दि. 29 ऑगस्ट 2016 ते आजपर्यंत या कालाधीत जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळले असतील अशा खेळाडूंनी प्रमाणपत्राच्या सत्य छायांकीत प्रतीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात  25 ऑगस्ट  2017 पर्यंत आपले प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जमा साद...

news 21.8.2017 dio buldana

ग्राहकांना कायद्याप्रमाणे संरक्षण मिळेल -          ए.पी भंगाळे बुलडाणा , दि . 21 : ग्रहकांचे हक्क, कर्तव्य व कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सेवा महत्वाच्या आहेत. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे निर्माण करण्यात आलेले आहेत. या कायद्यांप्रमाणे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण केले जाईल. त्यामुळे ग्राहकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, असा विश्वास राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए.पी भंगाळे यांनी व्यक्त केला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या इमारत नुतनीकरणाचा कार्यक्रम इमारतीच्या परीसरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड विजय सावळे, जिल्हा मंचचे अध्यक्ष विश्वास ढवळे, सदस्य मनिष वानखडे आदी उपस्थित होते.     याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी सेवा हमी कायद्यावर प्रकाश टाकीत शासनाला विहीत कालावधीत नागरिकांना सेवा द्यावयाच्या आहेत. सेवा म्हणजे उत्पादन व नागरिक म्हणज...

15.8.2017 dio buldana

Image
बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी -          पालकमंत्री पांडुरंग फुंडकर भारतीय स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिन थाटात साजरा पालकमंत्री यांच्याहस्ते ध्वजारोहण कृषी सन्मान योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य अभियानातंर्गत सर्वाधिक लाभ कर्जमाफी योजनेचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरावे बुलडाणा दि. 1 5 - राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिली.   भारतीय स्वातंत्र्याचा 70 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्...