Saturday 17 June 2017

news 18.6.2017 DIO BULDANA

डीएलएडच्या प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने
·        www.mscert.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
·        अर्जाची प्रत व त्यासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्रती 30 जून 2017 पर्यंत सादर कराव्यात
बुलडाणा, दि‍.17 -  शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी डी.एल.एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या www.mscert.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
    मार्च 2017 मध्ये राज्य मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सदर प्रवेश अर्ज 18 जून 2017 पर्यंत ऑनलाईन सादर करण्यात येणार होते. मात्र अर्जस्वीकृतीला मुदतवाढ मिळाली असून 30 जून 2017 पर्यंत  अर्ज भरण्यासाठी स्वत:चा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जाचे खुल्या संवर्गासाठी 200 रूपये शुल्क असून मागासवर्गीय प्रवर्गाकरीता 100 रूपये आहे.
   उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज  करावयाचा असेल, तर प्रत्येक माध्यमास संवर्गानुसार स्वतंत्र आवेदन पत्र शुल्क भरावे लागेल. प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन, payment gateway, Ewallet स्वत:चे किंवा नातेवाईकाचे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डद्वारे स्वीकारण्यात येतील.
   कला, वाणिज्य, विज्ञान एमसीव्हीसी शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता 12 वी खुल्या प्रवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुण मागासवर्गीय संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी संपूर्ण प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत व त्यासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्रतींसह जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, बुलडाणा येथे पडताळणी केंद्रावर 1 जुलै 2017 पर्यंत सादर कराव्यात. कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. पडताळणीशिवाय अर्ज प्रक्रियेत समाविष्ट होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.उमेदवारांना प्रवेश अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, चिखली रोड, बुलडाणा येथे व 8421003146, 9881270515 क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्राचार्य समाधान डुकरे यांनी कळविले आहे.
                                                                        *****             
     महीला लोकशाही दिनाचे 19 जून रोजी आयोजन
बुलडाणा दि‍.17 - प्रत्येक महीन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजीत  होणाऱ्या  जिल्हास्तरीय महीला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार 19 जून 2017 रोजी सकाळी  11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात करण्यात येणार आहे. या लोकशाही दिनात दाखल करण्यासाठी अर्जदाराने आपला अर्ज बाल विकास  प्रकल्प  अधिकारीएकात्मीक बाल विकास सेवा योजना या कार्यालयाकडे तहसिलदार यांचे नावे सादर करणे आवश्यक आहे. सदर महीला लोकशाही दिनमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा आस्थापनेबाबत बाबींचा  तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, तक्रारी स्वीकारल्या जाणार नाही, असे जिल्हा महीला बाल विकास अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.
                                                                        *****
मिरज येथील प्रौढ अपंग प्रशिक्षण
संस्थेत प्रवेश घेण्याचे आवाहन
बुलडाणादि. 17 : अपंग कल्याण आयुक्तालयाच्या अधिनस्थ असलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण संस्थेमध्ये सन २०१७-१८ या वर्षासाठी विविध अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली येथे ३१ जुलै २०१७ पर्यंत प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती सोबत पाठवाव्यात.
            या प्रशिक्षण संस्थेमध्ये सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस ऑफिस, मोआर अँण्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, एम.एस.सी.आयटी  या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्या जाणार आहे. या प्रवेशासाठी वयोमर्यादा १६ ते ४० वर्ष असावे, प्रशिक्षण कालावधी एक वर्ष असून केवळ अपंग मुलांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण, निवासाची व भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येते. प्रवेश अर्ज विनामूल्य असून स्वयंरोजगारासाठी समाज कल्याण विभागाकडून व्यवसायाकरीता बीज भांडवल योजनेची मदत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज, ता. मिरज, जि. सांगली येथे किंवा ०२३३-२२२२९०८, ९९२२५७७५६१ व ९९७५३७५५५७ क्रमांकावर संपर्क साधावा, असे वसतिगृह, मिरज यांनी कळविले आहे.
                                                                                    *****


No comments:

Post a Comment