Friday 22 July 2016

dio news buldana

जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, बस स्थानकासमोर, प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001 दूरध्वनी- 242341, फॅक्स- 242741 E-Mail : diobuldana@gmail.com वृतक्रमांक- 537 दि. 22 जुलै 2016 अंशदाय निवृत्ती वेतनामध्ये ‘मिसींग एंन्ट्री’ची नोंद घेण्यात येणार बुलडाणा दि 22 - जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये मिसींग असलेल्या एन्ट्रीची नोंद 25 जुलै 2016 ते 30 जुलै 2016 या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालयात घेण्यात येणार आहे. तरी अंशदायी निवृत्तीवेतन योजना(डीसीपीएस) मध्ये सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आर-3 व आर-2 विवरणपत्र, कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह कोषागार कार्यालयात घेवून उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ****** नांदुरा पंचायत समितीमधील ‘ते’ बियाणे शेतकऱ्यांना वितरणासाठीच बुलडाणा दि 22 - कृषि व पदुम विभागाच्या 5 जुलै 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार सन 2012-13 व 2013-14 मध्ये पिक कर्ज घेतलेले, परंतु थकबाकीदार असलेले शेतकरी खरीप हंगाम 2016 मध्ये नविन पीक कर्ज मिळण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी निश्चितच आर्थिक चणचण जाणवत असेल, कदाचित अशा शेतकऱ्यांनी अद्यापही पेरणी केलेली नसेल. पेरणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी नांदुरा येथे बियाण्यांची पाकिटे ठेवली होती. ही पाकिटे अशा शेतकऱ्यांनाच द्यावयाची आहेत. मात्र याबाबत चुकीची माहिती वृत्ताच्या माध्यमातून देण्यात आली. सदर बियाणे तालुका कृषि अधिकारी, नांदुरा यांना महिको सीड्स कंपनी लि. अकोला यांचे मार्फत 9 जुलै 2016 रोजी पुरवठा करण्यात आली होती. या बियाण्यांचे वाटपाची पुढील कार्यवाही तालुका कृषि अधिकारी व नांदुरा तहसीलदार यांचे समन्वयाने करण्यात येत आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे. ******** डीएलएडच्या प्रथम वर्षासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज आमंत्रित • www.mscert.org.in या संकेतस्थळावर करावे अर्ज बुलडाणा दि 22 - डीएलएड (डी.एड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. सदर प्रक्रियेसाठी www.mscert.org.in या संकेतस्थळावर सविस्तर सूचना व माहिती उपलब्ध आहेत. ही प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रकीयेमुळे स्थगित ठेवण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया 9 जुलै 2016 पासून सुरू झालेली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ यांचे आदेशान्वये सदर प्रक्रिया 21 जुलै ते 31 जुलै 2016 दरम्यान सुरू करण्यात आली आहे. जया उमेदवारांनी 9 जुलै 2016 ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे. अशा उमेदवारांनी नव्याने अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांनी 31 जुलै 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरून भरलेल्या अर्जाची प्रत मूळ कागदपत्रांसह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा येथे पडताळणी करून घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2016 असून डाएट स्तरावर प्रमाणपत्रे पडताळणी 1 ऑगस्ट 2016 पर्यंत करावी. अर्ज व पडताळणी केल्यानंतर 4 ऑगस्ट 2016 रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रथम फेरीची प्रवेश यादी 5 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापक विद्यालयात प्रवेश 5 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2016 दरम्यान घेता येणार आहे. सर्व सूचना व प्रवेश पात्रता याबाबतची माहिती 8 जून 2016 चे निवेदनानुसारच राहणार आहेत. सदर प्रवेश प्रक्रियेदरयामन उमेदवारांना काही अडचण निर्माण झाल्यास जिल्हा स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांच्याशी किंवा 07262-241520 व 9881270515 क्रमांकावर, राज्य स्तरावर 020-24497166, 24479513 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे डाएटचे प्रचार्य समाधान डुकरे यांनी कळविले आहे. **** कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा अकोला व बुलडाणा जिल्हा दौरा बुलडाणा दि 22 - कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर 23 व 24 जुलै 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा खालीलप्रमाणे : दि. 23 जुलै 2016 रोजी पहाटे 5.25 वाजता शेगाव रेल्वेस्थानक येथे आगमन, पहाटे 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, शेगाव येथे आगमन व राखीव, सकाळी 10.30 वाजता शेगांव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण व महाराष्ट्र एक्सप्रेसने अकोलाकडे प्रयाण, सकाळी 11.20 वाजता अकोला येथे आगमन व प्रमिलाताई ओक हॉलकडे प्रयाण, दुपारी 12 वाजता प्रमिलाताई ओक हॉल येथे आगमन व भारतीय जनता पार्टी जि. अकोला यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 2.10 वा आगमन व राखीव, दुपारी 3.10 वा. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट, दुपारी 3.30 वा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठकडे प्रयाण, दुपारी 3.45 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4.45 वाजता वसंत बाछुका यांची निवास्थानी सदीच्छा भेट, सायं 5 वाजता बाळापूर, जि. अकोलाकडे प्रयाण, सायं 5.30 वाजता बाळापूर येथे आगमन व भाजपा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती, सायं 6 वाजता बाळापूर येथून मौजे अटाळी ता. खामगांवकडे प्रयाण, सायं 6.30 वाजता विठ्ठल रूख्मिणी संत भोजने महाराज संसथान, अटाळी येथे आगमन व दर्शन, सायं 7 वाजता खामगावकडे प्रयाण, सायं 7.30 खामगांव येथे आगमन व मुक्काम. दि 24 जुलै 2016 रोजी दिवसभर खामगांव येथे राखीव, सायं 7 वाजता निवासस्थानावरून नांदुरा रेल्वेस्थानकाकडे प्रयाण, सायं 7.30 वाजता नांदुरा रेल्वे स्थानक येथे आगमन व मेल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील. ***** पिक विमा योजनेकरिता पेरापत्रक विनाविलंब देण्याचे तलाठ्यांना आदेश • शासन निर्णयानुसार पिक विम्यासाठी पेरापत्रक आवश्यक • पेरा पत्रक न देणाऱ्या तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई • जिल्हाधिकारी यांनी काढले परिपत्रक बुलडाणा दि 22 - पंतप्रधान कृषि पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 5 जुलै 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी धारण केलेल्या जमिनीचा पुरावा म्हणून सात बाराचा उतारा व शेतात अधिसूचित पिकाची पेरणी केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पिक विमा योजनेची अंमलबजावणी रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. कडून करण्यात येत आहे. या कंपनीच्या प्रतिनिधी समवेत चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी शेतकरी स्वयंघोषणापत्र भरून देतील, त्याठिकाणी तलाठ्यांनी त्यावर प्रतिस्वाक्षरी करावी. शेतकऱ्यांनी पीक पेरा तलाठ्यांकडून प्राप्त करून घ्यावेत. जे तलाठी पेरा प्रमाणपत्र देण्यास नकार देतील किंवा विलंब करतील, त्यांचेविरूद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकच काढले आहे. तरी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2016 करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 चा उतारा व अधिसूचित पिकाची पेरणी केलेले प्रमाणपत्र संबंधितांना द्यावेत. विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2016 पर्यंत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे. ****

No comments:

Post a Comment