Thursday 14 July 2016

जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, बस स्थानकासमोर, प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलडाणा- 443001 दूरध्वनी- 242341, फॅक्स- 242741 E-Mail : diobuldana@gmail.com वृतक्रमांक- 526 दि. 14 जुलै 2016 महीला लोकशाही दि‍नाचे 18 जुलै रोजी आयोजन बुलडाणा, 14 - प्रत्येक महीन्याच्या ति‍सऱ्या सोमवारी आयोजीत होणाऱ्या जि‍ल्हास्तरीय महीला लोकशाही दि‍नाचे आयोजन सोमवार 18 जुलै 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात येणार आहे. या लोकशाही दिनात दाखल करण्यासाठी अर्जदाराने आपला अर्ज विहीत नमुन्यात व सात दिवस आधी बाल विकास प्रकल्प अधि‍कारी, एकात्मीक बाल वि‍कास सेवा योजना या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा व वैयक्तिक स्वरूपाचे तक्रार नसावी. सदर महीला लोकशाही दि‍नमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा व आस्थापनेबाबत बाबींचा तसेच न्यायप्रवि‍ष्ठ प्रकरणे , तक्रारी स्व‍िकारल्या जाणार नाही, असे आवाहन जि‍ल्हा महीला व बाल वि‍कास अधि‍कारी पी. एस येंडोले यांनी केले आहे. **** नगर परिषद भरतीमधील परीक्षा 200 गुणांची राहणार बुलडाणा, 14 - जिल्ह्यात नगर परिषद संवर्ग कर्मचारी भरती प्रक्रिया – 2016 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीरात प्रकाशित करण्यात आली होती. या जाहीरातीत प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबाबत मुद्दा क्रं 3 व 4 मध्ये माहिती नमूद करण्यात आली होती. मात्र दोन ठिकाणी अभ्यासक्रमाविषयी या माहितीमध्ये नमूद असल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याअनुषंगाने परीक्षेच्या स्वरूपाबद्दल मुद्दा क्रं 4 मधील 1 ऐवजी मुद्दा क्रं 3 मधील 1 ग्राह्य धरावा. या भरतीमध्ये परीक्षा ही 200 गुणांची लेखी परीक्षा राहणार असून त्यामध्ये भाग 1 व 2 असणार आहेत. भाग 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धीक क्षमता चाचणी आणि भाग- 2 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संबंधीत प्रश्नांचा समावेश असणार आहे. तसेच भाग – 1 मध्ये 50 प्रश्न प्रती प्रश्न 2 गुण प्रमाणे 100 गुण व दोन मध्ये 50 प्रश्न प्रती प्रश्न 2 गुण याप्रमाणे 100 गुण, अशाप्रकारे ही परीक्षा 200 गुणांची राहणार आहे, असे नगर परिषद जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी कळविले आहे. ****** कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा दौरा बुलडाणा, दि. 14 - गृह, नगर विकास, बंदरे, विधी व न्याय, कौशल्य विकास व उद्योजकता, सांसदीय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील 15 जुलै 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 15 जुलै 2016 रोजी सकाळी 10 वाजता अकोला येथून मोटारीने शेगांवकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता शेगांव येथे आगमन व सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालय, खामगांव रोड, येथील जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेस उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता शेगांव येथून मोटारीने चिखलदरा, जि. अमरावतीकडे प्रयाण करतील. ******

No comments:

Post a Comment