news 23.11.2017 dio buldana
नवमतदारांना मिळणार स्मार्ट ओळखपत्र…! · 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत विशेष मोहिम · सहस्त्रक मतदार म्हणून होणार गौरव बुलडाणा, दि. 23 : संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 15 ते 30 नोव्हेंबर 2017 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान बीएलओ घरोघरी जावून मतदार यादीत नाव नोंदविणे व अन्य मतदारासंबंधी कामे करणार आहे. सदर बीएलओ घरी आल्यानंतर त्यांना सहकार्य करून आपले नाव मतदार यादीत नसल्यास ते नोंदवावे. तसेच बीएलओ 1 ते 8 नमुन्यांची माहिती संकलीत करून ऑनलाईन मोबाईल ॲपवर अपलोड करणार आहे. या नव मतदारांना स्मार्ट मतदान ओळखपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 21 व्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2000 रेाजी जन्म झाला व 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्ष पुर्ण करीत असलेल्या मतदारांना सहस्त्रक मतदार अर्थात मिलेनीयम वोटर्स म्हणून संबोधण्यात येणार आहे. जे मतदार सहस्त्रक मतदार म्हणून नोंदणी करतील अशा मतदारांचा घरोघरी जावून बीएलओ सत्कार करणार...