Tuesday 2 February 2021

DIO BULDANA NEWS 2.2.2021

विशेष घटक योजनेतंर्गत दुधाळ जनावरे व शेळी गटाचे वाटप *28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पंचायत समितीमध्ये अर्ज करावे *अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी असावा बुलडाणा, (जिमाका) दि. 2 - जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गातील लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेनुसार 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप करावयाचे आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू झालेली आहे. अर्ज 1 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात स्वीकारण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. दुधाळ जनावरे / शेळी गटासाठी एका कुटूंबातील केवळ एकाच लाभार्थ्यांनी अर्ज करावा, अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व दारिद्र्य रेषेखालील असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील सदस्याने सदर योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा, ही योजना 75 टक्के शासकीय अनुदान व 25 टक्के बँकेचे अर्थसहाय्य अशा स्वरूपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा, नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो जाडावा, अर्जदाराने जागा असल्याबाबत 7/12 किंवा नमुना 8 जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत सुशिक्षीत बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. तसेच आधार कार्ड व आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची सत्यप्रत जोडावी. सदर योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज करू नये. या योजनेमध्ये 3 टक्के अपंग व 30 टक्के महिला अर्जदाराचा समावेश असावा. योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी कोणत्याही दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. लाभार्थींना या योजनेचा लाभ सन 2020-21 च्या प्राप्त तरतुदीस अधिन राहून देण्यात येईल. तसेच निवड झाल्यापासून ते लाभ मिळाल्यानंतर कोणत्याही क्षणी लाभार्थींच्या अर्जामध्ये किंवा लाभानंतर त्रुटी, गैर प्रकार आढळल्यास निवड रद्द करण्यात येईल. योजनेची आर्थिक वसूली करण्यात येईल. त्याअनुषंगाने योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभापती राजेंद्र पळसकर व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे यांनी केले आहे. ***** आदिवासी उपयोजनेतंर्गत दुधाळ जनावरे व शेळी गटाचे वाटप *28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पंचायत समितीमध्ये अर्ज करावे *अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी असावा बुलडाणा, (जिमाका) दि. 2 - जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील लाभार्थ्यांना आदिवासी उपयोजनेनुसार 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप करावयाचा आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू झालेली आहे. अर्ज 1 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात स्वीकारण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. दुधाळ जनावरे / शेळी गटासाठी एका कुटूंबातील केवळ एकाच लाभार्थ्यांनी अर्ज करावा, अर्जदार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील व दारिद्र्य रेषेखालील असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील सदस्याने सदर योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा, ही योजना 75 टक्के शासकीय अनुदान व 25 टक्के बँकेचे अर्थसहाय्य अशा स्वरूपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा, नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो जाडावा, अर्जदाराने जागा असल्याबाबत 7/12 किंवा नमुना 8 जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत सुशिक्षीत बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. तसेच आधार कार्ड व आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची सत्यप्रत जोडावी. सदर योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज करू नये. या योजनेमध्ये 3 टक्के अपंग व 30 टक्के महिला अर्जदाराचा समावेश असावा. योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी कोणत्याही दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. लाभार्थींना या योजनेचा लाभ सन 2020-21 च्या प्राप्त तरतुदीस अधिन राहून देण्यात येईल. तसेच निवड झाल्यापासून ते लाभ मिळाल्यानंतर कोणत्याही क्षणी लाभार्थींच्या अर्जामध्ये किंवा लाभानंतर त्रुटी, गैर प्रकार आढळल्यास निवड रद्द करण्यात येईल. योजनेची आर्थिक वसूली करण्यात येईल. त्याअनुषंगाने योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभापती राजेंद्र पळसकर व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे यांनी केले आहे. ************* 50 टक्के अनुदानावर मिळणार एक दिवसीय कुक्कुट पक्षी * 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पंचायत समितीमध्ये अर्ज करावे बुलडाणा, (जिमाका) दि. 2 - शासन धोरणानुसार जिल्हा वार्षि‍क योजना सन 2020-2021 अंतर्गत एकात्मि‍क कुक्कुट ‍विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार 50 टक्के अनुदानावर एक दिवसीय सुधारीत कुकुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये एक दिवसीय पिल्लांची किंमत दोन हजार, औषधी खर्च 150 रूपये, रात्रीचा निवारा एक हजार व खाद्य भांडी 350 रूपये अशा एका गटाकरीता एकुण 16 हजार खर्च अपेक्षीत आहे.त्यापैकी 50 टक्के अनुदान 8 हजार रूपयांच्या मर्यादेत लाभार्थीस स्वत: उभारावयाचे आहे. सदर योजनेचा लाभ हा कोणत्याही गटातील लाभार्थी घेऊ शकतात. मात्र एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेतंर्गत 30 टक्के महीलांना, 3 टक्के अपंगांना, दारीद्रय रेषेखालील लाभार्थी, भुमीहीन शेतमजुर, मागासवर्गीय, अल्प, अत्यल्प भुधारक यांना प्राधान्य राहणार आहे. लाभार्थ्यांची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील निवड समि‍तीद्वारे करण्यात येईल. या योजनेसाठी 1 फेब्रुवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत अर्ज स्वि‍कारण्यात येणार आहे. या योजनेची विस्तृत माहिती व अर्जाचा नमुना, मार्गदर्शक सुचना व सविस्तर माहिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती व सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक लाभार्थींनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधीत तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्र पळसकर, सभापती पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती, जिल्हा परिषद बुलडाणा तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. ***** कोरोना अलर्ट : प्राप्त 379 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 44 पॉझिटिव्ह • 71 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि. 2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 423 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 379 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 274 तर रॅपिड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 379 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : शिरपूर 1, सिंदखेड 1, संग्रामपूर तालुका : उकळी 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : केळवद 5, मालगणी 1, अंचरवाडी 1, अंत्री खेडेकर 1, रानअंत्री 1, दे. राजा शहर : 8, लोणार शहर : 2, जळगांव जामोद शहर : 1, नांदुरा तालुका : खुमगांव 1, मलकापूर तालुका : दुधलगांव 1, मोताळा तालुका : पिंप्री गवळी 1, शेलगांव बाजार 1, मूळ पत्ता कोनड जि. जालना 1, भुसावळ जि. जळगांव येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे तळणी ता. मोताळा येथील 90 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 71 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा : 16, लोणार : 2, बुलडाणा : अपंग विद्यालय 16, स्त्री रूग्णालय 2, खामगांव : 1, शेगांव : 8, चिखली : 8, सिं. राजा : 3, मेहकर : 11, संग्रामपूर : 1, नांदुरा : 2, जळगांव जामोद : 1. तसेच आजपर्यंत 110204 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13554 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13554आहे. तसेच 929 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 110204 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14056 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13554 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 332 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 170 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** माजी खासदार पंढरीनाथ पाटील यांच्या समाधी स्थळाचा विकासासाठी निधी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचे उपमुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन बुलडाणा,(जिमाका) दि. 2 : दलितमित्र, बुलडाणा कॉन्सीलचे माजी अध्यक्ष, महात्मा फुलेंचे आद्यचरित्रकार, माती आमदार, माजी खासदार स्व. पंढरीनाथ पाटील यांच्या चिखली येथील समाधी स्थळाचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निधी मागणीसाठी निवेदन सादर केले आहे. या थोर पुरूषाचा आदर्श समाजाला सतत प्रेरणादायी ठरावा, त्यांचे समाजकार्य व स्मृती समाजासमोर तेवत रहावी, त्यासाठी स्व. पंढरीनाथ पाटील यांच्या समाधी स्थळाचा विकास होण्यासाठी अंदाजपत्रक 2020-21 मध्ये निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. *********** विवेकानंद जयंती महोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार कार्यक्रमांना 20 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी बुलडाणा,(जिमाका) दि.2 : विवेकानंद नगर ता. मेहकर येथील विवेकानंद जयंती महोत्सव कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, अन्य मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड 19 साथरोगाची लाट पुन्हा उफाळून गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विवेकानंद जयंती महोत्सवातील कार्यक्रमांसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. सदर सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू डाऊनलोड करावे. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. सर्व कार्यक्रम हे व्यासपीठावरील 20 व्यक्तींच्या उपस्थितीत व ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे. *********** एक्झॉटिक मागूर माशावर पुर्णत: बंदी; मासळीचे साठे होणार नष्ट बुलडाणा,(जिमाका) दि.2 : राष्ट्रीय हरित लवाद, नवि दिल्ली यांनी दि. 22 जानेवारी 2019 आदेशान्वये एक्झॉटिक मागुर (क्लॉरिअस गॅरीपिनस) माशावर पुर्णत: बंदी घातलेली आहे. सदर आदेशानुसार मासळीचे मत्स्यबीज संचयण करणे, संवर्धन करुन वाढविणे, उत्पादन घेणे , विक्री करणे आणि आहारात खाण्यासाठी मासळी वापरण्यास बंदी घातलेली आहे. या मासळीमुळे प्रदुषण होते आणि घातक गंभीर आजार या मासळीचे सेवन, खाणाऱ्यास होतात. त्यामुळे एक्झॅटिक मागूर क्लॅरिअस गॅरीपिनस मासळीचे साठे जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली नष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे. तसेच मागूर मासळीची विक्री होत असल्यास किंवा मस्त्य साठयाबद्दल माहिती असल्यास तातडीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी यांना माहिती दयावी. तसेच याची नोंद घेऊन सामाजिक आरोग्य जपण्यासाठी हे मिशन यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) स. इ नायकवडी यांनी केले आहे. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक 07262 – 242254, ई –मेल bulfish@rediffmail.com , मो. क्र. 9029515539 असा आहे. तरी याबाबत माहिती मिळाल्यास या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. ********

No comments:

Post a Comment