DIO BULDANA NEWS 29.5.2020
टेकडी तांडा गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. टेकडी तांडा येथील लोकसंख्या 350 असून टँकरद्वारे गावाला दररोज 12 हजार 50 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी कळविले आहे. ...