Posts

Showing posts from October, 2017

news 31.10.2017 dio buldana

       सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता रॅली ·         राष्ट्रीय एकतेची दिली शपथ बुलडाणा, दि. 31 -   लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस आज 31 ऑक्टोंबर 2017 रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त एकता रॅलीचे आयोजन पोलीस मुख्यालय मैदानावर करण्यात आले. या एकता रॅलीला शुभारंभप्रसंगी आमदार चैनसुख संचेती, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली.   पोलीस मुख्यालय मैदान येथून सदर रॅली कारंजा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, बाजार लाईन, कारंजा चौक व पोलीस मुख्यालय मैदान अशी काढण्यात आली. रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय मैदानावर करण्यात आला. रॅलीमध्ये महाविद्यालयीन, विद्यालयीन विद्यार्थी, पोलीस दलाचे जवान आदींचा समावेश होता.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब सातपुते यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय एकतेची ...

news 27.10.2017 dio buldana

Image
पालकमंत्री यांच्याहस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण राज्यस्तरीय शालेय कराटे   स्पर्धा       बुलडाणा , दि. 27 : स्थानिक सहकार विद्या मंदीर येथे आयोजित राज्यस्तर शालेय कराटे स्पर्धेतील विविध वजन गटातील विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण आज 27 ऑक्टोंबर 2017 रोजी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री. वाछा, श्री. नायर, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील आदी उपस्थित होते.       विदर्भात प्रथमच कराटे खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा बुलडाण्यात आयोजित होत असल्याबद्दल  क्रीडा विभागाचे आभार मानीत पालकमंत्री यावेळी म्हणाले,  या स्पर्धांतून खेळाडूंची राष्ट्रीय चमूमध्ये निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक खेळाडूने जीव ओतून खेळला असेल. भविष्यात या खेळांमधून खेळाडूने आपले करीअर करून देशाचे नाव उंचवावे.    याप्रसंगी प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. आभार बी. आर जाधव यांनी मानले. खेळामध्ये प्रथम, द्वितीय...