अमृत-आयजीटीआर मार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्जाचे आवाहन
बुलढाणा
दि. 2 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण
प्रबोधिनी (AMRUT), पुणे आणि इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद यांच्या संयुक्त
विद्यमाने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
युवक-युवतींसाठी रोजगाराभिमुख मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात
येत आहे.
या
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दहावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर
युवक-युवतींना उद्योगाभिमुख तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. CNC Technology,
CAD/CAM Design, AutoCAD, SolidWorks, CATIA, PLC Programming, Robotics &
Automation तसेच Mechatronics यांसारख्या आधुनिक व रोजगारक्षम अभ्यासक्रमांचा
समावेश करण्यात आला आहे.
प्रशिक्षण
कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनाची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून
देण्यात येणार आहे. तसेच उद्योगमान्य अभ्यासक्रमांद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचे
प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा
उद्देश या उपक्रमामागे आहे.
इच्छुक
उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 20
जून 2026 असून 22 जून 2026 रोजी प्रवेश परीक्षा,
कागदपत्र पडताळणी व मुलाखत घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणास 24
जून 2026 पासून प्रारंभ होणार आहे.
उमेदवारांनी
Mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्नेश कमाणी
(मो. 9112227637) यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्हा
कार्यालयाचा पत्ता : फ्लॅट क्रमांक 305, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग,
तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा – 443001.
प्रशिक्षणाचे प्रमुख फायदे :
• पूर्णपणे मोफत प्रशिक्षण
• मोफत निवास व भोजन सुविधा
• उद्योगमान्य अभ्यासक्रम
• आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
• रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी
आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांतील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन AMRUT
प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment