आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण
बुलढाणा दि. 1 (जिमाका): प्रधानमंत्री जन आरोग्य
योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ
नागरिकांसाठीच्या आयुष्मान वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला जिल्ह्यात
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील सात दिवसांत आयुष्मान भारत
योजनेअंतर्गत १७ हजार १२० लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली असून,
आयुष्मान वय वंदना कार्डसाठी १ हजार २९३ ज्येष्ठ नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया
यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना
दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे
नागरिकांनी स्वतःचे तसेच कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे आयुष्मान भारत कार्ड आणि
वय वंदना कार्ड तातडीने तयार करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले
आहे.
आयुष्मान कार्ड किंवा वय वंदना कार्ड काढण्यासाठी
नागरिकांनी आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,
ग्रामीण रुग्णालय, आयुष्मान आरोग्य मंदिर तसेच आपले सरकार सेवा केंद्र (CSC) येथे
संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता
येणार आहे.
जिल्हाधिकारी
डॉ. प्रवीण देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात
येत असून विविध विभागांच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ
पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या कुटुंबाचे
आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड त्वरित तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment