प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी अर्ज मागविले; 31 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी
बुलढाणा
दि. 1 (जिमाका): केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास
विभागामार्फत दिला जाणारा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल
पुरस्कार 2026 यासाठी पात्र मुलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि
शौर्य या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या मुलांना हा
प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
या
पुरस्कारासाठी अर्जदाराचे वय 5 वर्षांपेक्षा अधिक आणि 31 जुलै 2026 रोजी 18
वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र मुलांचे प्रस्ताव संबंधित मुले स्वतः
किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, जिल्हाधिकारी,
पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदींकडून सादर करता
येतील.
अर्ज
प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुकांनी 01 एप्रिल 2026 ते
31 जुलै 2026 या कालावधीत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल
या संकेतस्थळावर अर्ज करावेत.
जिल्ह्यातील
शिक्षण, क्रीडा, कला, सामाजिक कार्य, संशोधन किंवा शौर्य क्षेत्रात विशेष कामगिरी
केलेल्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले
आहे. पुरस्कारासंदर्भातील सविस्तर माहिती, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
000000
Comments
Post a Comment