माझे गाव' आरोग्य संपन्न गाव" कृतीदल समितीची सभा संपन्न
बुलढाणा,दि.3
(जिमाका) : "माझे गाव आरोग्य संपन्न गाव"
अभियानांतर्गत कृतीदल समितीची सभा गटविकास अधिकारी बी. बी. हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली
संपन्न झाली. सभेमध्ये विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. सर्व
राष्ट्रीय कार्यक्रमांची उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरावर उत्कृष्ट
कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विविध कार्यक्रमांचे अहवाल व ऑनलाइन रिपोर्ट
वेळेत व अद्यावत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आयुष्मान भारत कार्ड
व आयुष्मान वय वंदना कार्ड 100 टक्के काढण्याबाबत विशेष भर देण्यात आला. यासाठी सर्व
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून पात्र
लाभार्थ्यांचे शंभर टक्के कव्हरेज पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सदर सभेस सहाय्यक गटविकास
अधिकारी आरबी शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, गटशिक्षण अधिकारी अशोक
लांजुळकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती देशमुख, विस्तार अधिकारी डी.
एस. इंगळे, प्रभाती माळी, सामाजिक कार्यकर्ता सौरभ मुकुंद, उपअभियंता (पाणीपुरवठा विभाग),
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. ए. जैस्वाल, डॉ. पूजा मुळे, डॉ.
संकेत चव्हाण तसेच तालुका आरोग्य सहाय्यक जी. एस. डांगे उपस्थित होते. सभेच्या शेवटी
विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून आरोग्यदायी व निरोगी गाव निर्मितीसाठी सर्वांनी सक्रिय
सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
0000
Comments
Post a Comment