विधान परिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा
बुलढाणा,दि.3 (जिमाका) : महाराष्ट्र
विधानपरिषद सभापती राम शिंदे हे गुरुवार दि. 4 जुन 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
येत आहे.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार
गुरुवार दि. 4 जुन रोजी सकाळी 5.40 वाजता संभाजीनगर येथून शेगाव रेल्वे स्थानक येथे
आगमन व भक्तनिवास, श्री गजानन महाराज संस्थान शेगावकडे प्रयाण. सकाळी 5.55 वाजता भक्तनिवास
येथे आगमन व राखीव.
सकाळी 8 वाजता श्री गजानन
महाराज संस्थान, शेगाव येथे दर्शन व सकाळी 8.20 वाजता शेगाव येथून मोटारीने बुलढाणाकडे
प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता तहसिल चौक, बुलढाणा येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. बुलढाणा येथून
12 वाजता मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण
करतील.
00000
Comments
Post a Comment