बुलढाणा जिल्हा आयुष्मान कार्ड ई-केवायसीमध्ये राज्यात अव्वल
बुलढाणा
दि. 1 (जिमाका): आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत
आयुष्मान कार्ड ई-केवायसी मोहिमेत बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत मागील
सात दिवसांत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्यातील
लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका,
अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत यंत्रणा तसेच संबंधित विभागांच्या समन्वयातून विशेष मोहीम
राबविण्यात आली. या मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया
पूर्ण झाली असून जिल्ह्याने राज्यस्तरावर अव्वल स्थान मिळविले आहे.
जिल्हा
प्रशासन व आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे तसेच क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या
परिश्रमांमुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे. पात्र लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी
केलेली नसल्यास ती तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले
आहे.
जिल्ह्याच्या
या यशाबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच आरोग्य
विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
00000
Comments
Post a Comment