आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द

 

आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द

बुलढाणा दि. 1 (जिमाका): शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन तसेच महिला विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या वार्षिक निवडणूक-२०२६ साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे जून महिन्यात हे दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक २६ सप्टेंबर २०१२ च्या परिपत्रकानुसार विभागीय लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिन नियमितपणे आयोजित केले जातात. दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी १८ मे २०२६ पासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.

शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू असते, त्या ठिकाणी संबंधित स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येत नाही. त्यामुळे जून २०२६ महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने याबाबत जनसामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी