क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह, मोताळा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 


बुलढाणा दि. 2 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वसतीगृह, मोताळा (जि. बुलढाणा) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

वसतीगृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शालेय विभागातील विद्यार्थिनींसाठी प्रवेश अर्ज करण्याची मुदत १ जून ते ३० जून २०२६ अशी असून, इयत्ता ११ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

शालेय विभाग, कनिष्ठ महाविद्यालयीन विभाग तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध रिक्त जागांवर गुणवत्ता व प्रवर्गनिहाय प्रवेश दिला जाणार आहे. वसतीगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील अपंग आणि अनाथ विद्यार्थिनींना शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार प्रवेश दिला जाईल.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी www.hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वसतीगृह प्रशासनाने केले आहे.

जास्तीत जास्त मागासवर्गीय व गरजू विद्यार्थिनींना वसतीगृह योजनेचा लाभ मिळावा तसेच कोणतीही पात्र विद्यार्थिनी या सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी