मलकापूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलढाणा दि. 2 (जिमाका): सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले शासकीय मुलींचे वसतीगृह, मलकापूर (जि. बुलढाणा) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27
साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
वसतीगृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,
शालेय विभागातील विद्यार्थीनींसाठी प्रवेश अर्ज करण्याची मुदत 1
जून 2026 ते 30 जून 2026 अशी असून, इयत्ता
11 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 15 जुलै 2026 पर्यंत
ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
सन 2026-27 मध्ये शालेय, कनिष्ठ महाविद्यालयीन
व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांवर गुणवत्ता व प्रवर्गनिहाय प्रवेश
दिला जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,
विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील दिव्यांग व अनाथ
विद्यार्थीनींना शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थीनींनी www.hmas.mahait.org
या संकेतस्थळावर जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतीगृह प्रवेश
पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वसतीगृह प्रशासनाने केले आहे.
जास्तीत जास्त मागासवर्गीय व गरजू
विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ मिळावा तसेच कोणतीही पात्र विद्यार्थीनी
प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी पालक व विद्यार्थीनींनी मुदतीत अर्ज सादर
करावेत, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment