मेहकर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलढाणा
दि. 2 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, मेहकर येथे शैक्षणिक वर्ष
२०२६-२७ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रवर्गनिहाय
आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष
मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील शालेय (इयत्ता ८ वी वरील),
कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी
प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
वसतिगृहात
सर्व सोयी-सुविधा मोफत उपलब्ध असून प्रवेशासाठी विद्यार्थिनींनी गुणपत्रिका, शाळा
सोडल्याचा दाखला, वयाचा पुरावा, जात प्रमाणपत्र, शाळा किंवा महाविद्यालयाचे
बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
प्रवेशासाठी
इच्छुक विद्यार्थिनींनी http://hmas.mahait.org या
संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, मेहकर येथे संपर्क
साधावा, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment