बुलढाण्यात मंगळवारी(दि.4) पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 


बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलडाणा आणि श्री. शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोताळा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी श्री.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोताळा जि. बुलढाणा येथे करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

दहावी, बारावी आयटीआय, पदवीधर पुरुष महिला उमेदवारांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोताळा जि. बुलढाणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन सहभागी होऊन रोजगार प्राप्त करुन घेण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.

पात्र, गरजू व नौकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीता सुध्दा मुलाखत देऊ शकतात. तरी मेळाव्याच्या ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्याच्या प्रतिनीधी समवेत मुलाखत द्यावी व बुलढाणा जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.

याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (०७२६२-२४२३४२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी