DIO BULDANA NEWS 22.08.2024

 जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा

बुलडाणा, दि. 22 : विविध सेवाभावी संस्थेतर्फे जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

कारागृहातील बंद्यांकरीता धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक, समुपदेशपर उपक्रम राबविण्यात येतात. या दृष्टिकोनातून दि. 19 ऑगस्ट रोजी कारागृहातील बंद्यांकरीता बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी, बुलडाणा यांच्यातर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बंद्यांना फळवाटप करण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर, तुरुंगाधिकारी मोहन पाटील, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोयायटीचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. सुकेश झंवर, प्रशासकीय अधिकारी नम्रता पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी कृषी सहायक गजानन सांगळे, लिपिक अपर्णा आघाव, सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार सुनील धाकडे, संजय मदारकर, कारागृह शिपाई जितेश काळवाघे, दिनेश डोंगरदिवे, सुमंता राजपूत, वैभव राणे, चंद्रकांत महाले, शिवदास शिंदे, आनंद पवार, संदिप राजपूत, दिपक वाघ, करण सुलाने यांनी पुढाकार घेतला.

00000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या