मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा व शिबीरांचे आयोजन
मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा व शिबीरांचे आयोजन बुलढाणा दि. 31 (जिमाका):- निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा तसेच मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली आहे. ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने दि. 1 ते 7 नोब्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभामध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून व...