महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणास प्रारंभ · सुनगांव व साखळी येथे प्रात्याक्षिकाद्वारे सुरूवात बुलडाणा, दि. 24 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास बुलडाणा तालुक्यातील साखळी बु व जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथून आधार प्रमाणीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सुनगांव येथे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या हस्ते, तर साखळी बु. येथे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 1 लक्ष 95 हजार 56 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुनगांव व साखळी येथील अनुक्रमे 364 व 192 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दोन्ही गावातील एकूण 404 शेतकऱ्यांच्या आधार प्रमा...