जिल्ह्यात राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन राबविणार..
· 30 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये माहिती देण्याचे आवाहन · लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलनासाठी मोहिम बुलडाणा,दि.27 : जिल्ह ्यात राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन राबविण्यात येणार आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी व लाभार्थ्यांपर्यंत परिणामकारक रितीने पोहोचविणेकरीता योजनेच्या तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक रितीने राबविणेकरीता प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे. त्याची पहिली पायरी म्हणून सध्या सुरू असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान 30 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा केल्या जाणार आहे. या दिवशी आयोजित ग्रामसभांमधून लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. याकरीता 21 मे 2018 पर्यंत जिल्ह्यात मोहिमच राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत योजनेचा लाभाबद्दल माहिती देणे, विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण करणे व जेथे ग्रामसेवक, एएनएम व आशा आहेत तेथे त्यांच्या माध्...