केंद्रीय पथकाने घेतला बोंडअळी नुकसानीचा आढावा
शेतकऱ्यांशी चर्चा करुन घेतली माहिती बुलडाणा, दि 17:- मागील खरीप हंगामात बोंडअळीमुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एन डी आर एफ कडून सुध्दा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार आज 17 मे 2018 रोजी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतक-यांशी चर्चा करून बोंडअळीचा आढावा घेतला. पथकाने सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगांव माळ व दे. राजा तालुक्यातील भिवगांव येथे भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ शशिकांत खेडेकर उपस्थित होते. बोंडअळीग्रस्त शेतक-यांना शासनाने नुकतीच जिल्ह्यासाठी पहील्या टप्प्यात 35 कोटी 82 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एन डी आर एफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले आहे. पथक तेथील शेतक-यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेत...