Tuesday 31 January 2017

news 31.1.2017 dio buldana

पदवीधर मतदारांना मतदानासाठी तीन तासांची सुट्टी
·        पदवीधर विधान परिषद निवडणूक
·        खाजगी आस्थापना कामगार, कर्मचारी यांना सुविधा
    बुलडाणा दि‍.31 - अमरावती विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक 2017 जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत मतदानासाठी 3 फेब्रुवारी 2017 रोजी पदवीधर मतदारांनी मतदान करण्यासाठी खाजगी आस्थापनावर असलेल्या कामगार व कर्मचारी यांना तीन तासाची सुट्टी देण्यात येणार आहे. तरी खाजगी आस्थापनांनी तीन तासांची कामगारांना सुट्टी द्यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
*********
विधान परिषद मतदानासाठी आज सायंकाळपासून दारुबंदी जाहीर
बुलडाणा दि‍.31 -अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2017 जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे.  या निवडणूकीसाठी उद्या 1 फेब्रुवारी 2017 सायंकाळी 4 वाजेपासून दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे मतदानाचा अगोदरचा दिवस 2 फेब्रुवारी व मतदानाचा दिवस 3 फेब्रुवारी 2017 संपूर्ण दिवसाकरीता दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएल-4  व एफएलबीआर-2 अनुज्ञप्त्या सर्व किरकोळ अनुज्ञप्त्या बंद राहणार आहे.
  या अनुज्ञप्त्या उपरोक्त तारखांना सुरू असल्यास त्यांचेविरूद्ध नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            ******
माहे जानेवारी 2017 चे  केरोसीन नि‍यतन जाहीर
बुलडाणा,दि.31 - माहे जानेवारी 2017  करीता  केरोसीन  नि‍यतन  वि‍तरीत करण्यात आले आहे. नियतनाप्रमाणे कोटा तालुक्याला देण्यात आलेला आहे. त्यानुसार शेगांव, नांदुरा, दे. राजा व चिखली तालुक्यातील डिलरसाठी भारत पेट्रोलीयमकरीता  एकुण 144 के.एल, अकोला, मलकापूर, चिखली व खामगांव येथील डिलरसाठी हिं‍दुस्थान पेट्रोलीयम करीता एकुण 312 के.एल आणि मलकापूर, मेहकर, नांदुरा, बुलडाणा व अकोला येथील डिलरसाठी इंडीयन ऑइल पेट्रोलीयमकरीता एकुण 228 के.एल, असे एकुण 684 के.एल. केरोसीनचे नि‍यतनाचा कोटा करण्यात आला आहे.
या कोट्याप्रमाणे तालुकानि‍हाय वाटप करण्यात आलेले नि‍यतन पुढीलप्रमाणे-
बुलडाणा 60, चि‍खली 96, दे राजा 48, मेहकर 66, लोणार 42, सि.‍ राजा 48, खामगाव 90, शेगाव 54, मलकापुर 36, मोताळा 60, नांदुरा 6, जळगाव जामोद 48 व संग्रामपुर 30 के.एल केरोसिनचे नियतन वितरीत करण्यात आले आहे, असे  जि‍ल्हा पुरवठा अधि‍कारी, बुलडाणा यांनी कळवि‍ले आहे.
                                        ******
शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तयार होणार
·        केंद्र सरकारकडून एनडीएएल विकसित
·        31 मार्च 2017 पूर्वी माहिती सादर करावी  
बुलडाणा,दि.31 - शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत 31 मार्च 2016 पूर्वी देण्यात आलेल्या सर्व शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तयार करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एनडीएल व्यवस्था विकसित केली आहे. यामध्ये माहिती 31 मार्च 2017 पूर्वी भरून युआयएन  क्रमांक शस्त्र परवानाधारकांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी युआयएन प्राप्त असलेल्या शस्त्र परवानाधारकांनी 15 फेब्रुवारी 2017 पूर्वी उपविभागीय दंडाधिकारी अथवा जिल्हा दंडाधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा व आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. अशा शस्त्र परवानाधारकांना युआयएन प्राप्त करता येणार आहे.
    केंद्र शासनाने तयार केलेल्या एनडीएलमध्ये शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भरून युआयएन प्राप्त न केल्यास शस्त्र परवाना आपोआप रद्द होणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी शस्त्र परवानाधारक यांची राहील, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    *****
जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द
  बुलडाणा, दि.31 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. मात्र फेब्रुवारी  महिन्याचा 6 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाणारा लोकशाही दिन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची आचारसंहिता असल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.  राज्य शासनाच्या 26 सप्टेंबर 2012 रोजीच्या परिपत्रकानुसार निवडणूकरीता आचार संहिता लागू करण्यात आलेली असल्यास त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येत नाही. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  
                                                        ******
मतिमंद व मानसिक संबधीत आज होणारे अपंग तपासणी बोर्ड रद्द

बुलडाणा, दि. 31 : सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारला मतिमंद व मानसिक संबधीत अपंग तपासणी बोर्ड आयोजित करण्यात येते. मात्र येथील मानसोपचारतज्ज्ञ रजेवर असल्यामुळे सदर बोर्ड उद्या 1 फेब्रुवारी 2017 रोजी घेतले जाणार नाही. तसेच नेत्र संबंधीत अपंग तपासणी बोर्ड नियमित सुरू राहणार आहे. तरी रूग्ण व नातेवाईक यांनी सदर अपंग तपासणी बोर्डास येवू नये. आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे. 

No comments:

Post a Comment