sant gajanan maharaj palakhi
संत श्री गजानन महाराज यांची पालखी 1 ऑगस्ट रोजी सिंदखेडराजात मेहकर ते जालना रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने रूग्णवाहीका, शववाहिका व अग्नीशमन दलाच्या वाहनांना सूट 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू बुलडाणा, दि. 30 - श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या मार्गावर आहे. ही पालखी 1 ऑगस्ट 2016 रोजी सिंदखेड राजा येथे येत आहे. नाव्हामार्गे सिंदखेड राजा शहरात या पालखीचे आगमन होणार आहे. तरी पालखीतील भाविकांची संख्या व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी बघता मेहकर ते जालना या राज्य महामार्ग क्रमांक 186 रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. सध्याचा मार्ग मेहकर-सुलतानपूर-सिंदखेड राजा- न्हावा- जालना आहे, तर परतीचा जालना-न्हावा-सिंदखेड राजा- सुलतानपूर-मेहकर आहे. या मार्गामध्ये 31 जुलै 2016 रोजी रात्री 12 ते 2 ऑगस्ट 2016 रोजीच्या रात्री 12 पर्यंत सदर वाहतूक मेहकर-चिखली-देऊळगाव राजा-जालना मार्गे वळविण्यात आली असून परतीची जालना-दे.राजा-चिखली-मेहकर मार्गे वळविली आहे. ...