बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर

बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - पालकमंत्री पांडुरंग फुंडकर पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात ऐतिहासिक कर्जमाफी योजना कार्यवाहीत जिल्हा राज्यात प्रथम मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत अर्ज करण्याचे आवाहन जिल्ह्यातील 441 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी यांत्रिकीकरण योजनेला 10 कोटी रूपयांची वाढीव तरतूद 587 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त, मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्तीचा संकल्प बुलडाणा, दि. 26 - कापूस पिकावर आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात बोंडअळीने नुकसान झालेल्या 2.4 लक्ष शेतकऱ्यांच्या 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त बाधीत असलेल्या 1.90 लक्ष हेक्टरवरील क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या नुकसानीपोटी 134.34 कोटी रूपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिल्या जाणार असून बोंडअळी न...